शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कुणालाही माफ करणार नाही

By admin | Updated: July 12, 2017 02:55 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हे देशालाच आव्हान आहे. या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरतेने घेतले आहे.

गृहराज्यमंत्री हंसराज अहिर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हे देशाला आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हे देशालाच आव्हान आहे. या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरतेने घेतले आहे. आम्ही कुणालाही माफ करणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी केले. अमरनाथ हल्ल्याबाबत नागपूर विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमरनाथ यात्रेवर झालेल्या या हल्ल्याचा अंदाज लावणे कठीण होते. अनेक दिवसांपासून अमरनाथ यात्रा सुरू असून, सुरक्षा यंत्रणांमुळे दहशतवाद्यांना कारवाई करता आली नाही. अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू होती. पोलीस, सीआरपीएफ यांनी सर्व सुरक्षा व्यवस्था चोख उभारली होती. हा हल्ला का झाला, याची चिंता आहेच. परंतु हल्ल्यानंतर आता तेथील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. नि:शस्त्र लोकांवर हल्ला ही बहादुरी नाही. महिला, मुलांवर झालेला हल्ला भ्याडपणा आहे. हे आमच्यासाठी आव्हान आहे, असे अहिर म्हणाले. गृहमंत्री राजनाथ सिंह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. यापुढे असे होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. हल्ल्याच्या मागे कुठली दहशतवादी संघटना आहे, याला आम्ही महत्त्व देत नाही. सत्य समोर येईलच. मात्र कुठलीही संघटना ही शेवटी दहशतवादीच आहे. आम्ही कुणालाही माफ करणार नाही, असे अहिर यांनी स्पष्ट केले.