शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

नो मेनू, नो कूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:40 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज, शुक्रवारी नागपुरात येत आहेत. राष्ट्रपतींचा दौरा म्हटले की राजभवनात त्यांच्या निवासापासून तर भोजनापर्यंतची विशेष व्यवस्था केली जाते.

ठळक मुद्देराष्ट्रपती कोविंद घेणार साधे भोजन : वरण, भात, भाजी, पोळीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज, शुक्रवारी नागपुरात येत आहेत. राष्ट्रपतींचा दौरा म्हटले की राजभवनात त्यांच्या निवासापासून तर भोजनापर्यंतची विशेष व्यवस्था केली जाते. यावेळी मात्र, राष्ट्रपती कोविंद यांचा मुक्काम अगदी साधेपणाचा असणार आहे. राष्ट्रपतींच्या भोजनासाठी कुठल्याही मेनूची यादी त्यांच्या कार्यालयाने पाठविलेली नाही. दिल्लीहून त्यांचा विशेष कूकही येणार नाही. वरण, भात, भाजी, पोळी असे साधे जेवण राष्ट्रपती घेणार आहेत.राष्ट्रपतींच्या दौºयासाठी पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था सर्वत्र कडेकोट असते. राष्ट्रपती हे सर्वोच्च संवैधानिक पद असल्यामुळे राजशिष्टाचाराच्या बºयाच गोष्टी त्यात असतात. विशेषत: राष्ट्रपती जेथे थांबणार, जेवण करणार त्या गोष्टींबाबत प्रशासन दक्ष असते. त्याची विशेष काळजी घेतली जाते. राष्ट्रपती कोविंद हे २२ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच नागपुरात येत असल्यामुळे या गोष्टी स्वाभाविकपणे येणारच. परंतु, राष्ट्रपतींच्या या दौºयाकरिता त्यांचे येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवनात तीन दिवसांपूर्वी निरोप आला आणि साºयांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एरव्ही राष्ट्रपतींच्या दौºयात त्यांचा विशेष खानसामा असतो. कोविंद यांनी त्या प्रथेलाही फाटा दिला. तुम्ही जे बनवाल तेच राष्ट्रपतींना चालेल. तिखट, तेलकट, तुपकट नाही. एवढीच माफक अपेक्षा राष्ट्रपती भवनातून राजभवनला आलेल्या दिशानिर्देशात व्यक्त केली आहे. राष्ट्रपती राजभवनात दुपारी २.३० नंतर येतील. तेथेच भोजन घेतील. त्यानंततर अर्धा तास विश्रांती घेतील व नंतर अर्धा तास नागरिकांना भेटतील.दिल्लीहून येणाºया ताफ्यातही कपातराष्ट्रपतींचा दौरा असला की ५० अधिकारी, कर्मचाºयांचा ताफा दिल्लीहून येतो. यात डॉक्टर, स्वीय सहायक, कार्यालयीन कर्मचाºयांचा समावेश असतो. मात्र, यावेळी फक्त २३ कर्मचारी येत आहेत.