शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढ नकोच

By admin | Updated: July 14, 2016 03:02 IST

महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगसमोर बहुवार्षिक वीज दरवाढ याचिका सादर केली आहे.

वीज नियामक आयोगाची जनसुनावणी : जनसामान्यांचा विरोध; तक्रारींचा पाऊस नागपूर : महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगसमोर बहुवार्षिक वीज दरवाढ याचिका सादर केली आहे. आयोगाने या याचिकेवर बुधवारी वनामती सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. दिवसभर चाललेल्या या जनसुनावणीदरम्यान विविध वीज ग्राहक संस्था, संघटना आणि व्यक्तिगत वीज ग्राहकांनी आपले म्हणणे मांडले. यावेळी बहुतेकांनी प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध केला. महावितरण व एकूणच वीज कंपन्याच्या विरोधात यावेळी तक्रारी आणि सूचनांचा पाऊस पडला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सदस्य सचिव अश्विनी कुमार, सदस्य दीपक लाड आणि अजीज खान यांच्या आयोगासमोर वनामती सभागृहात सकाळी जनसुनावणी घेण्यात आली. सुरुवातीला महावितरणने याचिकेसंदर्भात आपले म्हणणे विषद केले. यानंतर वीज ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले म्हणणे सादर केले. एमआयए असोसिएशन, हिंगणाचे माजी अध्यक्ष मयंक शुक्ला यांनी सांगितले की, वीज दरवाढीचा प्रस्ताव हा अनावश्यक व सामान्य वीज ग्राहकांवर बोजा टाकणारा आहे. यामुळे श्रेणीनिहाय विचार केला तर २५ ते २८ टक्के वीज ग्राहकांवर बोजा पडणार आहे. वीज कंपन्यांच्या अकार्यक्षमतेचा बोजा सामान्य ग्राहकांवर टाकण्यात येऊ नये, हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र जिचकार यांनी सांगितले की, प्रस्तावित दरवाढीचे दूरगामी परिणाम सर्वच ग्राहकांवर होतील. एसआयटी चौकशी व्हावी देवेंद्र गोडबोले यांनी यावेळी प्रशासकीय दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेचा बोजा सामान्य वीज ग्राहकांवर टाकला जात असल्याचे सांगितले. अनेक लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाईक हे कंत्राटदार आहेत. त्यांनाच कामे दिली जातात. ती निकृष्ट केली जात असल्याने एकच काम वारंवार केले जाते. यातून खर्च वाढतो. याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जुने दर आणखी दोन वर्षे तसेच ठेवण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.