शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

डोस मिळालेच नाहीत; आजही लसीकरण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात तर झाली आहे. परंतु त्याप्रमाणात डोसचा पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात तर झाली आहे. परंतु त्याप्रमाणात डोसचा पुरवठा होत नाही. यामुळे मागील सात दिवसात तीन दिवस शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. २३ जूनला १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने २५ जून, २७ जून व २९ जून रोजी लसीकरण झाले नाही. त्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत मनपाला डोस उपलब्ध झाले नाही. यामुळे बुधवारी पुन्हा शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाकडून कोविशिल्डचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. यामुळे बुधवारी लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. परंतु तीन केंद्रावर कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. यात मेडिकल कॉलेज, स्व. प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्र व डॉ. बाबासाहब आंबेडकर रुग्णालयाचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.

नागपूर शहरात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचा डोस घेण्याला उत्साही प्रतिसाद आहे. या वयोगटात २८ जूनपर्यंत शहरात १ लाख ४६ हजार ५११ लाभार्थींना डोस देण्यात आले. तर २८ जूनपर्यंत एकूण ६ लाख ६६ हजार २७२ लाभार्थींनी पहिला डोस घेतला. तर एकूण २ लाख १२ हजार ३८५ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. आतापर्यंत एकूण ८ लाख ७८ हजार ६५७ डोस नागपूर शहरात देण्यात आले.

...

नागपूरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२८ जून २०२१)

पहिला डोस

आरोग्य सेवक- ४६,२६६

फ्रंटलाईन वर्कर- ५३,२९६

१८ वयोगट- १,४६,५११

४५ वयोगट- १,५०,४४३

४५ कोमार्बिड - ८५,९५८

६० सर्व नागरिक- १,८३,७९८

पहिला डोस - एकूण - ६,६६,२७२

दुसरा डोस

आरोग्य सेवक- २,५३,३४२

फ्रंटलाईन वर्कर- २२,७०२

१८ वयोगट- ७,७५६

४५ वयोगट- ४५,१७६

४५ कोमार्बिड - २१,६२२

६० सर्व नागरिक-८९,२१७

दुसरा डोस - एकूण - २,१२,३८५

संपूर्ण लसीकरण एकूण - ८,७८,६५७