शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:08 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर अक्षरश: धूळफेक करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या अर्जावर निर्णयच नाही फाईल्स समोर सरकतच नाहीत

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर अक्षरश: धूळफेक करण्यात येत आहे. विद्यार्थी कल्याणअंतर्गत विद्यापीठात १३२ हून अधिक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र विद्यार्थी विकास मंडळाच्या असंवेदनशीलतेमुळे यातील एकाही योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अगोदर विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी चकरा मारायला लावल्या जातात. सर्व दस्तावेज सादर केल्यानंतरदेखील अनेक वर्ष अर्जांवर काहीच निर्णय घेण्यात येत नाही. काही काळाने फाईल्स धूळ खात असल्याचे दिसून येते. पालक-विद्यार्थ्यांनी विचारपूस केली तर समितीची बैठक झाली नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात येते. अशा स्थितीमुळे विद्यार्थीच अर्ज करण्यासाठी कचरत आहेत. वास्तविकपणे योजना राबविण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा दाखविल्या जातो. त्यामुळेच अर्जांवर वर्षानुवर्षे निर्णय होऊ शकत नाही.नियमांनुसार अर्ज आल्यानंतर मंडळाने लगेच त्यावर निर्णय घेणे अभिप्रेत आहे. मात्र असे होत नाही. अर्ज कार्यालयातच दोन ते तीन महिने पडला असतो. निर्णय घेणाऱ्या समितीची बैठक बोलविण्यातदेखील विलंब लावला जातो. समितीचा निर्णय झाल्यानंतर फाईल योजनेनुसार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येते. मात्र फाईल तेथेदेखील धूळ खात पडली असते. उर्वरित वित्त व लेखा अधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात येते. अनेक विद्यार्थ्यांच्या तर फाईल्सच गायब झाल्या आहेत. याबाबतीत प्रतिक्रियेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विद्यापीठाची अशीही असंवेदनशीलताविद्यापीठ विद्यार्थी कल्याण योजनेत विद्यार्थ्यांना वैद्यकीय साहाय्यता निधीदेखील समाविष्ट आहे. मात्र यासाठी येणाºया अर्जांबाबत तर असंवेदनशीलतेचा कळसच गाठण्यात येतो. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिंकू बंगाले हिची तब्येत खराब झाली. त्यामुळे तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. विद्यार्थिनीकडून योजनेसाठी एप्रिलमध्ये अर्ज करण्यात आला. आतापर्यंत निर्णय झालेला नाही. तिचे वडील रवींद्र बंगाले एका दुकानात काम करतात. रिंकूचा अद्यापही उपचार सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख रुपयांचा खर्च झाला आहे. याचप्रमाणे धनवटे नॅशनल महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही बांते हिचीदेखील तब्येत बिघडली. तिच्यावर उपचारांसाठी लाखोंचा खर्च आला. पालकांनी वैद्यकीय साहाय्यता निधीसाठी आॅगस्टमध्ये अर्ज केला. मात्र अद्यापही निर्णय आलेला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे वैदेही आता या जगात नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ