शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

१२९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी; नागपूर विद्यापीठाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:24 IST

बारावीचे निकाल तोंडावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १२९ संलग्नित महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनो सावध व्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीचे निकाल तोंडावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १२९ संलग्नित महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी केली आहे. निरंतर संलग्नीकरणाची प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने त्यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मागील वर्षी विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती.नागपूर विद्यापीठात ५८४ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२९ महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. शिवाय महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते. विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही. त्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत.दोन वर्षांपासून लागते आहे प्रवेशबंदीनागपूर विद्यापीठाने या महाविद्यालयांना वारंवार इशारा दिला होता. संबंधित महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. २०१७ साली ११४ तर २०१८ साली २५३ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावण्यात आली होती.जर मागील वर्षीच प्रवेशबंदी लावली तर त्यांचे संलग्नीकरण कायमस्वरूपी रद्द का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नामांकित महाविद्यालयांचा समावेशप्रवेशबंदीच्या या यादीमध्ये नागपुरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांनीदेखील प्रक्रिया न राबविल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयातील अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी लागू आहे की नाही याची खातरजमा करावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ