शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा २७ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

By admin | Updated: August 28, 2016 01:59 IST

उपराजधानीला मॉडेल सोलर सिटी रूपाने विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापालिके च्या इमारती,

नागपूर : उपराजधानीला मॉडेल सोलर सिटी रूपाने विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापालिके च्या इमारती, कार्यालये, शाळा, हॉस्पिटल, पाणीपुरवठा केंद्र व खुल्या जागांवर २७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र (सोलर फोटो व्होल्टाईक पावर पॅक) उभारण्याची योजना राबविली जात आहे. या प्रकल्पावर २३८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पावरील चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून ३० टक्के अनुदान मिळण्याची आशा आहे. उर्वरित ७० टक्के खर्च हा उत्पादित विजेमुळे बिलाच्या रकमेच्या बचतीतून केला जाणार आहे. २७ मेगावॅट ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास हा प्रकल्प महापालिकेसाठी एक वरदान ठरण्याची शक्यता आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हायमास्ट व मोठ्या मैदानावरील दिवे,पथदिवे ऊर्जा कार्यक्षम एलईडी पथदिव्यांनी बदलण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिके ला दर महिन्याला वीज बिलावर १० कोटी खर्च करावे लागतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भविष्यात महापालिकेचा दर महिन्याचा १० कोटींचा खर्च वाचणार आहे. (प्रतिनिधी)१६३५ वॉटर हिटरचे वाटप रखडलेमॉडेल सौर सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सामान्य नागरिकांना सौरऊर्जेवरील वॉटर हिटर वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३४५० नागरिकांना ९.३८ कोटींचे सौरऊर्जेवरील वॉटर हिटर वितरित केले जाणार होते. परंतु यातील १८१५ वॉटर हिटर वितरित करण्यात आले आहेत. परंतु उर्वरित १६३५ वॉटर हिटरसाठी केंद्र सरकारकडून अद्याप अनुदान अप्राप्त आहे. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चातून सोलर वॉटर हिटर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर तो सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.