शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक याचिका खारीज करण्याची नितीन गडकरी यांची विनंती अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST

नागपूर : मतदार मो. नफिस खान यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका खारीज करण्यात यावी अशा विनंतीसह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक ...

नागपूर : मतदार मो. नफिस खान यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका खारीज करण्यात यावी अशा विनंतीसह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६(१) अंतर्गत दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून आला.

मो. नफिस खान यांनी निवडणूक याचिकेसोबतच्या प्रतिज्ञापत्रातील ४५-ए क्रमांकाच्या पानाची प्रत पुरवली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१(३) मधील तरतुदीचे उल्लंघन झाले आहे. याशिवाय ही निवडणूक याचिका कलम ८३(२) मधील तरतुदीचेही पालन करीत नाही. करिता ही याचिका कलम ८६(१) अंतर्गत खारीज करण्यात यावी असे गडकरी यांचे म्हणणे होते. मो. नफिस खान यांनी या आक्षेपांवर उत्तर सादर करून गडकरी यांना निवडणूक याचिकेची प्रत पुरवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, गडकरी यांनी दाखवलेली त्रुटी दूर करण्यायोग्य असून त्यांना ४५-ए क्रमांकाचे पान पुरवले जाईल असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाला या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे निवडणूक याचिका खारीज करण्यास नकार देण्यात आला. तसेच, ४५-ए क्रमांकाच्या पानाची प्रत गडकरी यांना १० दिवसात पुरवण्यात यावी असे निर्देश खान यांना देण्यात आले. गडकरी यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर व अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी कामकाज पाहिले.

---------------------

असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे

नितीन गडकरी मे-२०१९ मध्ये लोकसभेच्या नागपूर मतदार संघातून विजयी झाले आहेत. दरम्यान, त्यांनी या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा योग्य हिशेब सादर केला नाही. निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी खरे उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे मो. नफिस खान यांचे म्हणणे आहे.