शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी उद्घाटन

By admin | Updated: May 24, 2017 02:40 IST

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे बांधण्यात आलेल्या नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे

कृषी विकास प्रतिष्ठान : आसाम व मेघालयचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे बांधण्यात आलेल्या नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी (२७ मे रोजी) सकाळी ११ वाजता आसाम व मेघालयचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. याशिवाय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, खा. रामदास तडस, खा. अशोक नेते, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अविनाश पांडे, आमदार डॉ. आशिष देशमुख व उद्योगपती सत्यनारायण नुवाल उपस्थित राहतील. कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी मंगळवारी एका पत्रपरिषदेत या केंद्राची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, भाऊसाहेब देशमुख यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रचनात्मक काम केले आहे. त्यामुळेच या केंद्राला त्यांचे नाव दिले. येथील २.५ एकर जागेत हे केंद्र होत आहे. यात एकाच वेळी १०२ शेतकरी राहू शकतील. शिवाय सुमारे १२५ शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी सुसज्ज असे सभागृह बांधण्यात आले आहे. या व्यतिरिक्त भोजन कक्ष, प्रशासकीय कक्ष, विचार कक्ष व स्वयंपाकगृह सुद्घा तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसराला गांंधी-आंबेडकर असे नाव देण्यात आले असून, सभागृहाला विठ्ठल वल्लभ, विचार कक्षाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रशासकीय कक्षाला सत्यनारायण नुवाल, भोजन कक्षाला प्रा. राम शेवाळकर व स्वयंपाकगृहाला संत गाडगेबाबा गोपालकाला पाक कक्ष असे नाव देण्यात आले आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानासंबंंधी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाणार असल्याचे यावेळी गिरीश गांधी यांनी सांगितले. यावेळी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव सुधाकर कडू, सहसचिव बंडोपंत उमरकर व मार्गदर्शक बाळ कुलकर्णी उपस्थित होते.