शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 3, 2017 02:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागात झालेल्या चोरीप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अखेर नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला.

प्रदीर्घ चौकशी : विद्यापीठातील नाणे चोरी प्रकरण नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागात झालेल्या चोरीप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अखेर नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. विद्यापीठातर्फे विनोद राधेश्याम इलमे (वय ४८) यांनी बुधवारी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागात ठेवलेल्या २६३३ पुरातत्व वस्तू आणि २२४ विष्णुकुंडीय नाणी १० मे २०१६ ला चोरीला गेल्या. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. या प्रकरणात बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाने या सर्व मौल्यवान चीजवस्तू गहाळ झाल्याचा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. अंबाझरी पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गहाळ वस्तूंबाबत गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न उपस्थित झाला. चौकशीत या वस्तू चोरीला गेल्या असाव्या किंवा कुणी त्याची परस्पर गैरमार्गाने विल्हेवाट लावली असावी, असा संशय निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला ठोस भूमिका घेण्याची सूचना केली. त्यासंबंधाने पोलिसांकडून विस्तृत पत्रव्यवहार झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे बुधवारी रात्री इलमे यांनी अंबाझरी ठाण्यात चोरीची तक्रार दिली. चोरीला गेलेल्या नाण्यांसोबत उत्खणनात सापडलेल्या प्राचिन चीजवस्तूंचा (मूर्ती, भांडी, हत्यार, विविध वस्तू) समावेश आहे. या तक्रारीवरून ठाणेदार प्रसाद सबनीस यांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक सुरोसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)