शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नऊ जुगाऱ्यांना अटक, दाेघे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : पाेलिसांनी नरखेड शहरापासून दाेन किमीवर सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात नऊ जुगाऱ्यांना अटक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : पाेलिसांनी नरखेड शहरापासून दाेन किमीवर सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात नऊ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रक्कम, माेबाईल हॅण्डसेट एकूण १ लाख १४ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणारे दाेघे पळून गेल्याने त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली. ही कारवाई रविवारी (दि. ११) करण्यात आली

इस्ताज ऊर्फ गाेलू इद्रिस शेख, रा. वाॅर्ड क्रमांक-१३, नरखेड, धीरज रविदास साेनेकर, रा. वडचिचाेली, ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश, देवीदास शामराव कळसाईत, रा. टेकडी, पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश, नरेश चंद्रभान खाेडे, रा. गुजरी चाैक, पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश, नरेंद्र शंकर धवराळ, रा. जयस्वाल ले-आऊट, सावनेर, धनराज पांडुरंग ढाेके, रा. जाटलापूर, ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश, भीमराव जानराव साेमकुवर , रा. राजनी, ता. नरखेड, गजानन वासुदेव काटाेलकर, रा. जलालखेडा, ता. नरखेड, माेहसीम सलीम शेख, रा.माेवाड, ता. नरखेड, अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची तर रत्नाकर तागडे व याेगेश मदनकर दाेघेही रा. नरखेड अशी पसार जुगाऱ्यांची नावे आहेत.

नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथराेग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. असे असतानाही नरखेड शहरालगत जुगार खेळला जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी त्या ठिकाणाची पाहणी केली. तिथे जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट हाेताच लगेच धाड टाकली. या धावपळीत जुगार खेळणारे नऊ जण पाेलिसांच्या हाती लागले तर दाेघे पळून जाण्यास यशस्वी ठरले.

अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांकडून २८ हजार रुपये राेख, ८३ हजार ९०० रुपये किमतीचे पाच माेबाईल हॅण्डसेट, २३ हजार रुपयाचे इतर साहित्य व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली. पसार असलेल्या जुगाऱ्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, मनीष सोनोने, दिगांबर राठोड, राजकुमार सातुर, मिलिंद राठोड, कैलास उईके, नितेश पुसाम, हेमंत राठोड, सूरज मोहेकर, जगदीश उईके यांच्या पथकाने बजावली.