शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:11 IST

- नितीन गडकरी : चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०२० हे वर्ष ...

- नितीन गडकरी : चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध लेखिका चैताली बांगरे यांनी कोरोना व टाळेबंदीच्या काळातील अनुभवांवर लिहिलेल्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा हे आभासी माध्यमाद्वारे सोहळ्यात सहभागी झाले होते तर व्यासपीठावर प्रख्यात अधिवक्ता फिरदौस मिर्झा व चैताली बांगरे उपस्थित होते.

कोरोना ही एक आपत्ती आहे आणि संक्रमणाची गती आणखी वाढायला लागली आहे. अशा स्थितीत आपत्तीचे रूपांतरण इष्टापत्तीत करण्यासाठी प्रचंड चिंतनाची गरज आहे. समस्या उद्भवल्या तर मार्गही शोधावाच लागतो. आपल्याकडे पीपीई किट नव्हत्या तर नागपुरात निर्माणाच्या संधी शोधून त्याचा पुरवठा केला गेला. सॅनिटायझर हजार रुपये लिटर विकले जात होते. तेव्हा नागपूरच्या शुगर कारखान्यातच अल्कोहोलद्वारे सॅनिटायझर निर्माण करवून ते दीडशे रुपये लिटर पर्यंत सर्वसामान्यांना उपलब्ध करता आले. एकमेकांची मदत करण्याची वृत्ती याच काळात दिसून आली. समाजाची ही शक्ती आपल्या जीवनमूल्यांची देण असल्याची भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

या काळाने वेळेचे महत्त्व कळले आणि नातेवाईक, घर आणि जबाबदारीचे महत्त्व सगळ्यांना कळले. कोरोना हे संकट असले तरी या संकटाने आपुलकीची जाणिवही करवून दिली, अशी भावना विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आरजे नमन यांनी केले तर आभार विनय पाण्डे यांनी मानले.

............

फोटो ओळी :- ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे विमोचन आभासी माध्यमाद्वारे करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा तर व्यासपीठावर लेखिका चैताली बांगरे व ॲड. फिरदौस मिर्झा