शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नवीन शोध हीच चांगल्या वैज्ञानिकाची ओळख

By admin | Updated: January 19, 2017 02:54 IST

जगात आज कुठलीच गोष्ट अशक्य नाही. वैज्ञानिकांनी मनात आणले तर अनेक महत्त्वाचे व समाजाच्या हिताचे शोध लागू शकतात.

राकेश कुमार : पाच दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर : जगात आज कुठलीच गोष्ट अशक्य नाही. वैज्ञानिकांनी मनात आणले तर अनेक महत्त्वाचे व समाजाच्या हिताचे शोध लागू शकतात. किंबहुना असे नवनवीन शोधच वैज्ञानिकाला एक नवीन ओळख मिळवून देत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था,नागपूर (नीरी)चे निदेशक डॉ. राकेश कुमार यांनी केले. रमण विज्ञान केंद्र व तारामंडल विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्यावतीने बुधवारी आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एन. कुटुंबाराव, डॉ. राकेश कुमार व रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन. रामदास अय्यर उपस्थित होते. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे अपर महानिदेशक डॉ. एन. कुटुंबाराव म्हणाले, रमण विज्ञान केंद्राने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. हे विज्ञान प्रदर्शन समाज आणि मुलांसाठी निश्चितच लाभदायक सिद्ध होईल. या पाच दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप २२ जानेवारीला होईल. यात १३ वैज्ञानिक संस्था सहभागी झाल्या आहेत. या प्रदर्शनाद्वारे विविध विज्ञान आणि औद्योगिक संस्थांमध्ये होणारे संशोधन आणि विकास कार्य याबाबत समाजात जनजागृती केली जात आहे. या क्रमात यंदा जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डिझाईन डेव्हलपमेंट सेंटर, नागपूर व मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि., नागपूर या दोन नवीन विज्ञास संस्था सहभागी झाल्या आहेत. यातील पहिल्या संस्थेने अल्युमिनियमने मिश्रित धातू कसे बनविले जाते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. या संस्थेचे संशोधक विद्यार्थ्यांना सोने, चांदी, तांबे, पितळ हे धातू कोणत्या दगडापासून मिळतात याबाबत माहिती देताना दिसले. आज पहिल्या दिवशी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन संशोधनाचे कार्य समजून घेतले. रमण विज्ञान केंद्रातर्फे आयोजित थ्री डी शोलाही मोठा प्रतिसाद मिळाला.(प्रतिनिधी) सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत पाहता येईल प्रदर्शन विद्यार्थी व नागरिकांना हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ५या वेळेत मोफत पाहता येईल. या दरम्यान रोज दुपारी १२ वाजता वैज्ञानिक मार्गदर्शन करतील. आजच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन रमण विज्ञान केंद्राचे शिक्षा अधिकारी अभिमन्यू भेलावे यांनी तर आभार शिक्षा अधिकारी विलास चौधरी यांनी मानले.