शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ना हात ना पाय, तरीही ध्येय आकाश गाठण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

() मंगेश व्यवहारे नागपूर : ध्येय गाठायचे असेल तर आकाशाची उंची माेजण्याच्या भानगडीत पडू नये, इतके कणखर व्यक्तिमत्त्व आहे ...

()

मंगेश व्यवहारे

नागपूर : ध्येय गाठायचे असेल तर आकाशाची उंची माेजण्याच्या भानगडीत पडू नये, इतके कणखर व्यक्तिमत्त्व आहे आशुतोष पिल्लेवान या २८ वर्षीय युवकाचे. निसर्गाने त्याला ना हात दिलेत, ना पाय. पण बोलण्याचे कौशल्य, स्वप्न बघणारे डोळे आणि ते पूर्ण करण्याची जिद्द त्याच्या व्यक्तिमतत्त्वात ठायीठायी भरली आहे. त्यामुळेच तो आपल्यातील व्यंगत्वावर मात करून, आकाश गाठण्याचे स्वप्न बघतोय. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून समाजकल्याण अधिकारी बनण्याचे ध्येय आशुतोष बाळगून झपाटल्यागत संघर्ष करतोय.

कामठी येथील गौतमनगर जुनी छावणी येथे राहणाऱ्या आशुतोष अशोक पिल्लेवान याला बघितल्यावर आपल्याच हृदयाला कंप सुटतात. पण त्याच्याशी बोलल्यावर जगातल्या कुठल्याही अडचणीवर मात करता येते, याची जाणीव होते. आशुतोषचे हात आणि पाय सामान्यासारखे विकसित झालेले नाहीत. त्याला स्वत:च्या हाताने जेवणसुद्धा करता येत नाही. दुसऱ्याच्या मदतीशिवाय बाहेरही पडता येत नाही. सरावातून तो पायाच्या दोन बोटांनी सामान्यांसारखा लिहायला लागला. सामान्यांसारखे आपण नाही हे त्याला कळायला लागल्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ हे एक वाक्य त्याला प्रेरणा देऊन गेले. इतर कुठलाही पर्याय नसल्याने शिक्षणच आपल्याला तारू शकते याची जाणीव त्याला झाली. दहावी, बारावी, बीए, एमए पर्यंतचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करणाऱ्या आशुतोषने यासाठी लेखनिकाचीही मदत घेतली नाही. समाजशास्त्रात एमए केल्यानंतर आता आशुतोष स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आणि स्वत:च्या आकलनातून तो दररोज ६ ते ७ तास अभ्यास करतो आहे.

आपल्यातील व्यंगत्वाची जाणीव त्याला आहे. पण मेहनत एक दिवस नक्कीच रंग आणील याची खात्री तो बाळगतोय.

-आशुतोषला हवाय मार्गदर्शक

आशुतोष घराच्या बाहेर स्वबळावर पडू शकत नाही, त्यामुळे त्याला स्पर्धा परीक्षेसाठी एका मार्गदर्शकाची गरज आहे. यू-ट्यूब व ऑनलाईनच्या माध्यमातून त्याचा सराव सुरू आहे. पण मार्गदर्शक मिळाल्यास त्याचा मार्ग सुकर होणार आहे. स्वत:साठी दिव्यांगाची व्हेईकल घेण्याचे त्याचे स्वप्न आहे. पण परिस्थितीचा अडसर आहे.

- आयुष्यात जे मिळालेय त्याचेच धन्यवाद मानून स्वत:च्या बळावर उभे राहून आईच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे आहेत. मला एक दिवस समाजकल्याण अधिकारी बनायचे आहे.

आशुतोष पिल्लेवान, दिव्यांग विद्यार्थी

- खंत नक्कीच आहे, पण पोराचा आत्मविश्वास मनाला बळकट बनवितो. तो एक दिवस नक्कीच त्याचे स्वप्न पूर्ण करील, असा विश्वास आहे.

सरिता पिल्लेवान, आई