शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

डॉक्टरच्या चुकीमुळे शेजाऱ्यांनी केली अंत्यविधीची तयारी

By admin | Updated: August 23, 2015 03:19 IST

डॉक्टरने गंभीर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे व्हेंटिलेटर उद्या सकाळी काढून घेण्याची शक्यता वर्तविल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या .....

रेल्वे कर्मचारी जिवंत : खासगी रुग्णालयात घेत आहे उपचारनागपूर : डॉक्टरने गंभीर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे व्हेंटिलेटर उद्या सकाळी काढून घेण्याची शक्यता वर्तविल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या शेजाऱ्यांनी वृत्तपत्रात निधन वार्ता देऊन त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही केल्याची माहिती आहे. परंतु सुदैवाने अद्याप या कर्मचाऱ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शशिकांत उपहारे (५१) हे अजनी रेल्वेस्थानकावर ट्रेन नंबर क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. परवा गुरुवारी त्यांचा गंभीर अपघात झाला. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी दिवसभर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याची प्रकृती गंभीर असून उद्या सकाळी त्यांचे व्हेंटिलेटर काढल्यानंतर ‘बॉडी’ घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले. काही जणांनी सकाळी ‘बॉडी’ आणायची असल्यामुळे एका स्थानिक वृत्तपत्रात त्यांच्या निधनाची वार्तादेखील प्रसिद्ध केली. दुसऱ्या दिवशी रेल्वेचे जवळपास १०० कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती ठीक असून आपण ते मयत झाल्याचे घोषितच केले नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)