शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भागीदारीने दुर्लक्षित घटक येतोय मुख्य प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST

- एलजीबीटी समूहासाठी शासकीय ओळखपत्रांचे शिबिर : शिबिराचा आज शेवटचा दिवस - विदर्भातील पहिले आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क ...

- एलजीबीटी समूहासाठी शासकीय ओळखपत्रांचे शिबिर : शिबिराचा आज शेवटचा दिवस

- विदर्भातील पहिले आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वत:चे नाव, पत्ता, वय, कुटुंबाची माहिती नोंदवलेला कागद हाती घेऊन बाहेर पडणाऱ्या 'त्यांच्या' चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. हाती फार मोठी संपत्ती गवसल्याची ती जाण होती. आपण खऱ्या अर्थाने आता नागरिक झालो आहोत, याची ती सार्थता होती आणि आता पुढचे आयुष्य अधिक सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला झाला, याचा तो विश्वास होता.

निमित्त होते, एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती व एलजीबीटी ग्रूपसाठी आयोजित केलेल्या महासामाजिक भागीदारी शिबिराचे. ज्यात आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, तृतीयपंथी ओळखपत्र बनवणे व कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला होता. अशा प्रकारचे शिबिर हे विदर्भात प्रथमच घेण्यात आले.

तृतीयपंथी, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल व इतर या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्यावतीने सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. सहाय्यक आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आतापर्यंत ३०० हून अधिक तृतीयपंथी व अन्य सदस्यांनी आपली आवश्यक असणारी ओळखपत्रे बनवली.

जिथे प्रत्येक पावलावर व्यक्तीला आपली ओळख सिद्ध करावी लागते अशा या काळात या समुदायाकडे स्वत:ची कोणतीच अधिकृत ओळख पटवायला कोणताही शासकीय दस्तावेज नव्हता. कोरोनाकाळात लसीकरण करायचे झाले तरी आधारकार्डाची गरज पडत होती. या समुदायाची ही महत्त्वाची गरज लक्षात घेता, सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्यावतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराची माहिती तृतीय पंथियांना मिळावी, या हेतूने शहरातील तृतीय पंथियांच्या पाच घराण्यांमध्ये त्याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती विद्या कांबळे यांनी दिली. शिबिरात सहभागी झालेले शासकीय अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्यासाठीही हा एक अनोखा अनुभव ठरला. शिबिरात निकुंज जोशी, विद्या कांबळे, आनंद चांदरानी, आंचल शर्मा यांच्यासह अनेक नियोजनात व्यस्त होते.

-------------

अर्जावर घराण्यांची नावे

आधारकार्ड बनविण्यासाठी आईवडिलांचे नाव लागते. तृतीय पंथीय हे त्यांच्या घराण्यांवरून ओळखले जातात. शिबिरात त्या अर्जावर आई-वडिलांच्या नावाऐवजी या घराण्यांची नावे लिहिण्यात आली, अशी माहिती याठिकाणी असलेले अधिकारी अश्फाक बेग यांनी दिली.

-------------

ॲड्रेस प्रुफ सर्टिफिकेशनची विशेष सोय

पत्ता नीट नसणे, अन्य कागदपत्रे नसणे या बाबींमुळे आधार व पॅनकार्डसारख्या गोष्टी बनवायला अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी येथे विशेषत्वाने अ‍ॅड्रेस प्रूफ सर्टिफिकेशनची सोय करण्यात आली होती. त्यासाठी नायब तहसीलदार तेथे नियुक्त करण्यात येऊन संबंधित प्रमाणपत्र तत्काळ दिले जात होते.

---------------

लोकप्रतिनिधी म्हणून राखीव जागेची मागणी

तृतीय पंथीय व समलैंगिक व्यक्तींचे प्रतिनिधीत्व सरकारदरबारी असण्याची गरज येथे व्यक्त करण्यात आली. त्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी एक जागा राखीव असावी, अशी मागणी काही जणांनी व्यक्त केली.

.............