शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नीरी म्हणजे संपन्न जैवविविधतेचे घर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 10:40 IST

Nagpur News तज्ज्ञांच्या मते नीरीच्या आतील जंगल म्हणजे समृद्ध जैवविविधतेचे घरच आहे आणि त्याचे संवर्धन हाेणे नितांत गरजेचे आहे.

ठळक मुद्दे दुर्मीळ मांजराचेही वास्तव्य

श्रेयस हाेले

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी)ची जागा घेतली जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाेर देऊन स्पष्ट केले. यामुळे पर्यावरणवाद्यांनी समाधानाचा सुस्कारा साेडला. तज्ज्ञांच्या मते नीरीच्या आतील जंगल म्हणजे समृद्ध जैवविविधतेचे घरच आहे आणि त्याचे संवर्धन हाेणे नितांत गरजेचे आहे.

नीरीच्या जंगलात लुप्त हाेत असलेल्या दुर्मीळ मांजराचे अस्तित्व आढळून आल्याचे निरीक्षण काही तज्ज्ञांनी नाेंदविले आहे. मांजराची ही प्रजाती केवळ आशिया व आफ्रिकेच्या भागात आढळून येते. या मांजराचे अस्तित्व धाेकादायक स्थितीत पाेहोचले आहे. भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा-१९७२च्या शेड्यूल २ मध्ये या प्राण्याचा समावेश हाेताे. अशा दुर्मीळ प्रजातींच्या अस्तित्वाने पर्यावरण अभ्यासकांसाठी नीरीचे जंगल कायम कुतूहलाचा विषय ठरले आहे. एका माहितीनुसार काही वर्षांपूर्वी वनविभागाच्या पथकाने झाडांच्या अभ्यासासाठी नीरीच्या आतमध्ये सर्वेक्षण केले हाेते. त्यांच्या निरीक्षणानुसार नीरी परिसरात चंदन, विविध प्रजातीचे आंबे, निंबाची झाडे आणि अनेक दुर्मीळ प्रजातीच्या वनस्पती आढळतात. याशिवाय काही औषधी वनस्पतींचेही अस्तित्व येथे आहे.

केवळ वनस्पती नाही तर विविध प्रजातीचे पाेपट, माेर, सुतार, घुबड अशा विविध पक्ष्यांच्या प्रजातीचे वास्तव्य येथे आहे. मुंगुस व कासव या सामान्य प्रजातीच्या प्राण्यांचे वास्तव्य येथे आहे. नीरीचा परिसर जैवविविधतेने संपन्न आहेच, मात्र प्राणी आणि वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही संस्था अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निसर्गाचे, पर्यावरणाचे साैंदर्य वाढविणाऱ्या या परिसराचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याची भावना पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली.

टॅग्स :scienceविज्ञान