शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

सुईमुक्त इंजेक्शनने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती; इंजेक्शनची भीती आता इतिहासजमा !

By सुमेध वाघमार | Updated: July 26, 2025 17:54 IST

Nagpur : सुईमुक्त इंजेक्शन आहे सुई असलेल्या इंजेक्शनइतकेच प्रभावी

नागपूर: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना इंजेक्शनची आजही भीती वाटते. पण आता ही भीती कायमची दूर होणार आहे! कारण, सुईमुक्त इंजेक्शन (नीडल फ्री इंजेक्शन) वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवत आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी लहान मुलांमध्ये या इंजेक्शनचा वापर सुरू केला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे इंजेक्शनची भीती खऱ्या अर्थाने इतिहासजमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.    

डॉ. गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आधुनिक इंजेक्शन एखाद्या बंदुकीसारखे लोड केले जाते आणि हवेच्या दाबाने त्वचेमध्ये औषध सोडले जाते. यामुळे पारंपारिक इंजेक्शनप्रमाणे कोणतीही वेदना होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुईमुळे होणारा टिश्यू ट्रॉमा (ऊतींना होणारी इजा) टाळता येतो, ज्यामुळे इंजेक्शननंतर सूज येण्याची समस्या राहत नाही. विशेष बाब म्हणजे, हे सुईमुक्त इंजेक्शन सुई असलेल्या इंजेक्शनइतकेच प्रभावी आहे.

सुरक्षित आणि सोपे लसीकरणया इंजेक्शनचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता. इंजेक्शन देणाºया आरोग्य कर्मचाºयाला चुकून सुई टोचण्याचा धोका पूर्णपणे टळतो. यामुळे एचआयव्ही आणि हेपेटायटिस बी सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होण्याची शक्यताही कमी होते. 'नीडल फ्री इंजेक्शन' वापरण्यास अत्यंत सोपे आहे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरणात ते अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे डॉ. गावंडे यांनी सांगितले. विशेषत: लहान मुलांमध्ये दिल्या जाणाºया प्रतिबंधक लसीकरणात हे सुईमुक्त इंजेक्शन महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे लसीकरण अधिक सोपे आणि कमी भीतीदायक होईल.

भविष्यातील शक्यतासध्या हे सुईमुक्त इंजेक्शन सहा महिने ते वृद्धांपर्यंतच्या लोकांना दिले जात आहे. सहा आठवडे ते सहा महिन्यांच्या बाळांना हे इंजेक्शन देण्यासाठी सध्या चाचण्या सुरू आहेत, ज्या लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हे इंजेक्शन ०.५ मिलीलीटर पर्यंत औषध देण्यासाठी वापरले जाऊ शकते. जर १ मिलीलीटर औषधाची गरज असेल, तर ते दोनदा दिले जाते. सध्या हे इंजेक्शन फक्त द्रवरूपात असलेल्या औषधांसाठी उपलब्ध आहे. हे इंजेक्शन इंट्रामस्क्युलर म्हणजे स्नायूंमध्ये आणि इंट्राडर्मल म्हणजे त्वचेच्या वरच्या थरात (एपिडर्मिसमध्ये) दिले जाऊ शकते. सध्या हे सुईमुक्त इंजेक्शन पारंपारिक इंजेक्शनपेक्षा २०० ते ३०० रुपयांनी महाग असले तरी, याचा वापर जसजसा वाढेल, तसतसा भविष्यात त्याच्या किमती सामान्य होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य