शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ महाघोटाळेबाजाचे अभियांत्रिकीतदेखील ‘रॅकेट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘नीट’ महाघोटाळ्यांचे धागेदोरे नागपुरात सापडल्यामुळे अगोदरच खळबळ उडाली असताना या ‘रॅकेट’मध्ये अभियांत्रिकी ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘नीट’ महाघोटाळ्यांचे धागेदोरे नागपुरात सापडल्यामुळे अगोदरच खळबळ उडाली असताना या ‘रॅकेट’मध्ये अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशाचा गैरप्रकारदेखील सुरू होते का, यादृष्टीनेदेखील तपास सुरू आहे. सूत्रधार परिमल कोतपल्लीवारकडून आर.के.एज्युकेशन ॲण्ड करिअर गायडन्सचा जो प्रचार-प्रसार करण्यात यायचा, त्यात वैद्यकीय प्रवेशासह अभियांत्रिकी संस्थांमध्येदेखील सहज प्रवेश मिळवून देण्याचा दावा करण्यात येत होता. ‘लोकमत’च्या हाती या संस्थेचे पत्रक लागले असून त्यातून ही बाब उघड झाली आहे.

मुळात आर.के. एज्युकेशन ॲण्ड करिअर गायडन्स हे ‘कोचिंग क्लास’ नव्हते तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत ‘अर्थ’पूर्ण मार्गदर्शन करण्यात येत होते. संस्थेतर्फे ‘सोशल मीडिया’वरदेखील प्रवेशासंदर्भात प्रचार-प्रसार करण्यात येत होता. बारावीनंतर करिअरचा मार्ग सापडावा, यासाठी ‘नीट’सह ‘जेईई’साठीदेखील विद्यार्थी अभ्यास करत असतात. मात्र, ‘एनआयटी’ व ‘आयआयटी’ येथे फारच कमी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थी व प्रामुख्याने पालकांमधील स्पर्धा लक्षात घेता त्याचा गैरफायदा आर.के. एज्युकेशनकडून घेण्यात यायचा. संस्थतर्फे ‘सोशल मीडिया’वरदेखील जाळे फेकण्यात यायचे. ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या संस्थेच्या पत्रकात ‘मोठमोठ्या ‘एनआयटी’, ‘आयआयटी’सह अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी आम्ही समुपदेशन करतो’ असे लिहिले असून त्यात स्पष्टपणे ‘नीट’सह ‘जेईई’मध्येदेखील आमचे विद्यार्थी यश मिळवतात, असा उल्लेख आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरदेखील अभियांत्रिकी प्रवेशाबाबत स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे. ‘जेईई’मधील गैरप्रकारांसंदर्भात ‘सीबीआय’ने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीसह देशातील १९ ठिकाणी धाड टाकली होती.

अनेकांची फसवणूक, निकालानंतर कार्यालयात गर्दी

‘लोकमत’ने परिमल कोतपल्लीवारच्या नंदनवन चौकातील कार्यालयात जाऊन चौकशी केली. कार्यालय तर धाडी पडल्यापासून बंद आहे, परंतु तेथे बारावीचा निकाल लागल्यापासून विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढल्याची माहिती परिसरातील लोकांनी दिली. दुस-या मजल्यावरील कार्यालयात कोण येते, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले होते. कोतपल्लीवारने प्रवेशाच्या नावाखाली अनेकांकडून पैसे घेतले होते, परंतु प्रवेशच करून दिला नव्हता. फसवणूक झालेले लोक कार्यालयात आल्यावर त्यांच्याशी वाद घातला जायचा. वर्धा येथील एका विधवा महिलेने मुलासाठी पैसे दिले होते, परंतु तिची फसवणूक करण्यात आली. तिला अक्षरश: हाकलून लावण्यात आले होते. फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत तक्रार करण्याची आवश्यकता आहे.

नेमका आशीर्वाद कुणाचा ?

२०१५ साली कोतपल्लीवारला एआयपीएमटीतील गैरप्रकाराबाबत अटक झाली होती. मात्र, त्यातून बाहेर आल्यावर त्याने परत खुलेआम ‘रॅकेट’ सुरू केले. यासंदर्भात शिक्षणक्षेत्रातील सूत्रांना विचारणा केली असता त्याचे राजकीय संबंध चांगले असल्याची माहिती समोर आली. शिक्षणप्रणालीचा खेळखंडोबा करणाऱ्याला नेमका कुणाचा आशीर्वाद होता, हा प्रश्न उपस्थित होत आहे.