जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जामगाव खुर्द येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. सरपंचपदी अरुणा अशोक जुगसेनिया तर उपसरपंचपदी प्रशांत मसराम यांची निवड करण्यात आली आहे. जामगाव खुर्द ही ग्रामपंचायत सभापती नीलिमा रेवतकर यांच्या मतदार क्षेत्रात मोडते. येथील निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. विरोधी पक्षाने लढत देत ४ जागा मिळविल्या होत्या, तर राष्ट्रवादीने ५ जागेवर विजय मिळविला. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी दोन्ही गटाने अर्ज दाखल केले होते. सरपंचपदासाठी अरुणा अशोक जुगसेनिया व नंदिनी खरपुरीया यांनी अर्ज दाखल केला होता. यात जुगसेनिया ५ विरुद्ध ४ अशा मतांनी विजय झाल्या, तसेच उपसरपंचपदासाठी प्रशांत मसराम व सुधाकर खरपुरीया यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात प्रशांत मसराम यांनी ५ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळविला. नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचे पंचायत समिती सभापती नीलिमा सतीश रेवतकर, पं.स. माजी सभापती सतीश रेवतकर, वसंत चांडक, बालू जोध, चंदू पावडे, नामदेव पेठे व इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
जामगाव खुर्द ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST