शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जीवतोडेंच्या रूपात राष्ट्रवादीने खेळले ओबीसी कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

नागपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंड‌ळाचे अध्यक्ष, ओबीसींचे दिग्गज नेते डाॅ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. ...

नागपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंड‌ळाचे अध्यक्ष, ओबीसींचे दिग्गज नेते डाॅ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. हा प्रवेश घडवून राष्ट्रवादीने ओबीसी कार्ड खेळत पूर्व विदर्भातील ओबीसी समाजात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ओबीसी नेते म्हणून इमेज असलेले नाना पटोेले यांना त्यांच्याच पट्ट्यात एक पर्याय उभा करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

अशोक जीवतोडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक आहेत. तर ते धनोजे कुणबी समाजातून येतात. चंद्रपूर जिल्ह्यात या समाजाची गठ्ठा व्होट बँक असून ती निर्णायक ठरत आली आहे. राज्यभर ओबीसी आंदोलनाने जोर धरला आहे. सर्वच पक्ष ओबीसींना आपलेसे करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ओबीसी नेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे पूर्व विदर्भात तगडा ओबीसी चेहरा नाही. त्यामुळे ओबीसी समाज स्वत:कडे वळविणे राष्ट्रवादीला तसे कठीण होते. अशात राष्ट्रवादीने ओबीसी चळवळीतील आघाडीच्या नेतृत्वाला सोबत घेत पूर्व विदर्भात विस्कटलेली पक्षाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिन्यात नाना पटोले यांनी जीवतोडे यांची भेट घेत ऑफर प्रवेशाची दिली होती. पण जीवतोडे यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली.

अशोक जीवतोडे मूळचे काँग्रेसी आहेत. त्यांचे वडील श्रीहरी जीवतोडे हे १९६४ मध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा ते राष्ट्रवादीसोबत होते. सक्रिय राजकारणात नव्हते. धाकटे बंधू संजय जीवतोडे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक होती. मागील १० वर्षात अशोक जीवतोडे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढली होती. जीवतोडे विविध निवडणुकांमध्ये भाजपला मदत करतानाही दिसले. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपलाही धक्का बसला आहे.

ओबीसी चळवळीत कार्यकर्त्यांना मात्र चिंता

- जीवतोडे हे गेल्या काही वर्षांपासून ओबीसी चळवळीत सक्रिय आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक म्हणून काम करीत आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे पक्ष दबावाखाली येऊन चळवळीचे नुकसान होऊ नये, अशी चिंता चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.