शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांचे प्राथमिक आक्षेप खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST

नागपूर : लोकसभेच्या अमरावती मतदार संघातून विजय मिळविलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी ...

नागपूर : लोकसभेच्या अमरावती मतदार संघातून विजय मिळविलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्याविरुद्धच्या तीन निवडणूक याचिकांवर घेतलेले प्राथमिक आक्षेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी खारीज केले. तसेच, संबंधित आक्षेपांमुळे वर्तमान टप्प्यावर याचिका फेटाळता येणार नाही असे स्पष्ट केले. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली.

शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ, शिवसेना कार्यकर्ते सुनील भालेराव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. या तिघांनाही राणा यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवडणूक याचिका दाखल करताना कायदेशीर तरतुदींची काटेकोर पूर्तता केली नाही. राणा यांच्याकडे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्या सदर मतदार संघातून निवडणूक लढण्यास पात्र होत्या असे प्राथमिक आक्षेपांच्या अर्जात नमूद करण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने त्यांना सध्याच्या टप्प्यावर दिलासा देण्यास नकार देऊन सर्व याचिकांवर शेवटपर्यंत सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले. राणा यांना संबंधित आक्षेप पुढे आवश्यक त्या वेळी उचलता येतील असेही न्यायालयाने सांगितले. प्रकरणावर आता ५ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

------------------

याचिकाकर्त्यांचे म्हणणे

सदर मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. त्यामुळे त्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र होत्या. परंतु, त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी, अनुसूचित जातीवर अन्याय झाला. ही बाब लक्षात घेता त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. भालेराव यांच्यातर्फे अ‍ॅड. राघव कवीमण्डन, अडसूळ यांच्यातर्फे अ‍ॅड. सचिन थोरात तर, अंबाडकर यांच्यातर्फे ॲड. संदीप चोपडे यांनी कामकाज पाहिले.