शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पेंच, बोर, उमरेडच्या निसर्ग पर्यटनालाही हिरवी झेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:05 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाच्या मंजुरीनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला-पवनीमधील निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी मिळाली आहे.

ठळक मुद्दे१ ऑक्टोबरपासून प्रारंभ अटी-शर्तींसह मिळाली मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाच्या मंजुरीनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला-पवनीमधील निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी मिळाली आहे. १ ऑक्टोबरपासून येथील वन पर्यटन सुरू होत आहे. मात्र अटी-शर्तीच्या अधीन राहूनच या पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे.पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने मर्यादित स्वरूपात आरक्षण केले जाणार आहे. मात्र रस्त्यांच्या उपलब्धतेनुसार हा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी पर्यटन गेटवर बुकिंग करता येइल. त्यानंतर १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या काळात ऑनलाईन पद्धतीने ५० टक्के सफारी आरक्षण करता येणार आहे. कोरोनामुळे बरीच दक्षता घेतली जाणार आहे. सध्याच्या वाहनांच्या एकूण पर्यटन क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. एक वाहनचालक, एक मार्गदर्शक आणि चार पर्यटक अशा सहा जणांनाच प्रवेश राहणार आहे.सिलारी येथील पर्यटन संकुलामध्ये निवासासाठी फक्त क्षमतेच्या ३० टक्के परवानगी राहणार आहे. सुरेवानी आणि कोलितमारा येथील पर्यटन संकूल सध्या उपलब्ध नाही. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, गन थर्मामीटरद्वारे शरीराचे तापमान मोजणे आदी बाबींचा यात समावेश आहे. जिप्सीचे टायर बाथ करून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अतिपाऊस किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टीने मार्ग बंद करण्याचा अधिकार वन्यजीव विभागाने राखून ठेवला आहे.अडेगाव गेट बंदचअतिपावसामुळे बोर व्याघ्र प्रकल्पामधील अडेगाव गेट पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहे. यामुळे अर्थातच येथून पर्यटन करता येणार नाही. सुरेवानी-पवनी या प्रवेशद्वारातून खासगी पर्यटक वाहनांमध्ये फक्त जीपला परवानगी देण्यात आली आहे. बोरधरण व कऱ्हांडला या दोन्ही गेटवर जिप्सी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Tigerवाघtourismपर्यटन