शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

नैसर्गिक संपत्ती खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव

By admin | Updated: January 18, 2015 00:56 IST

दोन दिवसांपासून येथील आमदार निवासात सुरू असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीत पक्षाच्या राजकीय ठरावावर प्रदीर्घ चर्चा सुरू असून यात मोदी सरकारच्या

भाकप राष्ट्रीय समितीची बैठक: राजकीय ठरावावावर प्रदीर्घ चर्चानागपूर : दोन दिवसांपासून येथील आमदार निवासात सुरू असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीत पक्षाच्या राजकीय ठरावावर प्रदीर्घ चर्चा सुरू असून यात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यात आली आहे. देशातील नैसर्गिक तसेच राष्ट्रीय संपत्ती काही खाजगी कंपन्यांच्या (कॉर्पोरेट) घशात घालण्याचा केंद्राचा डाव असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.शुक्रवारी प्रथम राष्ट्रीय समितीची व त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. शनिवारी या बैठकीत पक्षाच्या राजकीय ठरावाच्या मसुद्यावर विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी चर्चा केली. पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय अधिवेशनाच्या दोन महिन्यापूर्वी ठरावाचा मसुदा प्रसिद्ध करणे गरजेचे असून त्यानंतर तो अधिवेशनात मांडण्यात येतो व त्यावर चर्चा केली जाते, असे राष्ट्रीय समितीचे सदस्य शमीम फैजी यांनी पत्रकारांना सांगितले.राजकीय ठरावाच्या मसुद्याची माहिती देताना फैजी म्हणाले की, लोकसभा निवडणूक निकालावर पक्षात गांभीर्याने चिंतन केले जात आहे. देशातील सत्तांतरामुळे झालेले बदल, त्यानुसार पक्षाच्या धोरणात करावे लागणारे बदल आणि पुढील तीन वर्षासाठी पक्षाची दिशा याचे विवेचन या ठरावात आहे. भाजपच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात सत्तारूढ होताच देशात कॉर्पोरेट हाऊसेसचे महत्त्व वाढले, कट्टरता वाढली आहे. तेल, नैसर्गिक वायु, कोळसा आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आदी देशाची नैसर्गिक आणि राष्ट्रीय संपत्ती आहे. मात्र जागतिक बँकेच्या दबावामुळे ही संपत्ती कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली रेल्वे, संरक्षण, बँका, विमाक्षेत्र या देशातील अर्थव्यवस्थेच्या सर्व प्रमुख क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची दारे खुली केली जात आहे. यासाठी अध्यादेश काढले जात आहे ही बाब संसदीय लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे फैजी म्हणाले. या ठरावावर शनिवारपर्यंत १८ राज्यातील १०० प्रतिनिधींनी त्यांचे मत मांडले. पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर देशकर उपस्थित होते. (प्रतिनिधी) डाव्या पक्षाचा फं्रटकेंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणापासून देशाला वाचवायचे असेल तर आर्थिक आणि समाजिक पातळीवर दुसऱ्या पर्यायावर विचार करावा लागेल. डावे पक्ष यासाठी पुढाकार घेणार असून येत्या तीन वर्षात सर्व डाव्या पक्षाचा फं्रट तयार केला जाईल. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचे या फं्रटमध्ये स्वागत असेल. त्यानंतर इतर धर्मनिरपेक्ष पक्षाची मदत घेतली जाईल, असे शमीम फैजी म्हणाले.महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष वळविण्यासाठीचभावनिक मुद्देदेशातील सामाजिक व आर्थिक प्रश्नांवरून सर्वसामान्यांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाणिवपूर्वक धार्मिकतेचा आधार घेत भावनिक मुद्दे उपस्थित करीत आहे. यामुळे देशाचे आर्थिक स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेला धोका आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपुष्टात आणले. तीच पद्धत त्यांनी आता पंतप्रधान झाल्यानंतर कायम ठेवल्यास लोकशाहीलाही धोका होण्याची शक्यता आहे, असे शमीम फैजी म्हणाले.