शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

२०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाला मंजुरी

By admin | Updated: July 29, 2016 02:46 IST

लोकमत समूह आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रध्वज प्रकल्पाला ...

लोकमत समूह आणि मनपाचा संयुक्त उपक्रम : स्थायी समितीत शिक्कामोर्तब नागपूर : लोकमत समूह आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रध्वज प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. नागपुरातील कस्तूरचंद पार्क येथे २०० फूट उंचीचा हा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. नागपुरात उंच राष्ट्रध्वज उभारला जावा यासाठी लोकमत समूह गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. काही महिन्यापूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त,सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते. या बैठकीत लोकमत समूह व महापालिका याच्या संयुक्त उपक्रमातून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रध्वज प्रकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली विविध विभागांची मंजुरी यापूर्वीच घेण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी दिली. ध्वजस्तंभ व झेंड्यावरील खर्च लोकमत समूह करणार आहे. महापालिकेतर्फे सौंदर्यीकरण व स्थापत्त्य कामे क रण्यात येतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे राहणार आहे. (प्रतिनिधी) ध्वजस्तंभाची उंची २०० फूट असून ध्वजाचा आकार ९० बाय ६० फूट राहील. लोकमत समूहातर्फे प्रकल्पाच्या जागेचे सौंदर्यीकरण, संकल्पना यासाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करण्यात येईल. ध्वजस्तंभाच्या तांत्रिक बाबी आयआयटी व एनआयटी यांच्याकडून तपासण्यात येतील. ध्वजस्तंभाची देखभाल व दुरुस्ती व व्यवस्थापन महापालिका करणार आहे. तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.