शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र आमदारांना देणार १०० कोटी

By admin | Updated: December 6, 2015 03:01 IST

शहरातील अनधिकृत ले-आऊटचा विकास करण्यासाठी नासुप्रतर्फे शहरातील आमदारांना एकूण १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

गडकरींचा पुढाकार : अनधिकृत ले-आऊटचा विकास होणारनागपूर : शहरातील अनधिकृत ले-आऊटचा विकास करण्यासाठी नासुप्रतर्फे शहरातील आमदारांना एकूण १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या निधीतून आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील रस्ते, गडर लाईन व जलवाहिनीची कामे करता येतील. ही कामे नासुप्र मार्फतच केली जातील.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नासुप्र अधिकारी व शहरातील आमदारांची संयुक्त बैठक घेतली होती. शहरातील बरेच अनधिकृत ले-आऊटमध्ये विकासापासून वंचित आहेत. आरक्षणाने बाधित ले-आऊटचीही अशीच स्थिती आहे. तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरे बांधली आहेत. संबंधित ले-आऊटमधील नागरिक विकास कामांसाठी आमदारांमागे तगादा लावतात. मात्र, विकास कामे करण्याचे अधिकार नासुप्रला आहेत. याची दखल घेत गडकरी यांनी आमदारांच्या शिफारशीनुसार विकास कामे करण्यासाठी नासुप्रने १०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना नासुप्रच्या अधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेचे पालन करीत नासुप्रने अनधिकृत ले-आऊटच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आमदार व नासुप्र अधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे यांच्यासह नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार उपस्थित होते. या वेळी सभापती वर्धने यांनी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ वगळता उर्वरित पाच मतदारसंघात प्रत्येकी २० कोटी रुपयांची विकासकामे केली जातील, असे स्पष्ट केले. संबंधित निधीतून कोणती कामे करायची या संबंधीचे प्रस्ताव आमदारांनी या बैठकीत नासुप्र सभापतींकडे सोपविले. काही कामांची यादी नासुप्रनेही तयार केली आहे. अशा परिस्थितीत संयुक्त सर्वेक्षण करून कामाची निवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)