शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

- तर नरखेडमध्ये राष्ट्रवादीचे आधीचेच उमेदवार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

नरखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपूर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या ...

नरखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपूर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या १६, तर पं.सं.च्या ३१ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्याचा फटका नरखेड तालुक्यातील दोन जि.प. सदस्य व दोन पं.स. सदस्यांना बसला आहे. मात्र नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत या उमेदवारांना सर्वसाधारण गटातून निवडणूक लढण्याची पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक झाल्यास राष्ट्रवादीकडून आधीच्याच उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

जि.प.च्या सावरगाव सर्कलमधून देवका पुरुषोत्तम बोडखे या ओबीसी (महिला) तर भिष्णूर सर्कलमधून पूनम जोध या ओबीसी (महिला) विजयी झाल्या होत्या. येथे सावरगाव पं.स. गणात वैभव वासुदेव दळवी हे ओबीसी सर्वसाधारण तर बेलोना पं.स. गणात रश्मी आरघोडे या ओबीसी (महिला) प्रवर्गातून विजयी झाल्या होत्या. त्यांच्यावर १४ महिन्यातच अपात्र होण्याची वेळी आली. हे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. २३ मार्च रोजी काढण्यात आलेल्या नवीन आरक्षण सोडतीत सावरगाव जि.प. सर्कल साधारण (महिला) भिष्णूर (सर्वसाधारण), सावरगाव पं.स. गण (सर्वसाधारण) तर बेलोना पं.सं. गण सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित झाला आहे. त्यामुळे येथे पुन्हा निवडणूक झाल्यास या चारही उमेदवारांना नव्या आरक्षण सोडतीनुसार निवडणूक लढता येईल.