शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

नारायण राणेंवर ‘विदर्भ कनेक्ट’चे टीकास्त्र

By admin | Updated: September 5, 2014 01:07 IST

‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी संघटनेने कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर वेगळ्या विदर्भ राज्यासंदर्भात ‘यू टर्न’ घेतल्याचा आरोप करीत टीका केली आहे.

मतांसाठी वेगळ्या विदर्भाला विरोध : कॉंग्रेस पक्षाचा केला निषेधनागपूर : ‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी संघटनेने कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर वेगळ्या विदर्भ राज्यासंदर्भात ‘यू टर्न’ घेतल्याचा आरोप करीत टीका केली आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी करणे काहीच गैर नसल्याचे मत राणे यांनी काही दिवसाअगोदर व्यक्त केले होते. परंतु मुंबई येथे कॉंग्रेसचा प्रचार आरंभ करताना त्यांनी अखंड महाराष्ट्राची पाठराखण केली. शिवसेनेला घाबरून कॉंग्रेसने अखंड महाराष्ट्राची भूमिका घेतली आहे, असा आरोप ‘विदर्भ कनेक्ट’च्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे.काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचाराचा मुंबई येथील हुतात्मा चौकात सोमवारी प्रारंभ करताना संघटनात्मक ५४ जिल्ह्यांसाठी ५४ प्रचारज्योत प्रज्वलित केल्या. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची पाठराखण केली. अखंड राज्यासाठी १०५ हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाला विसरणार नाही, असे नारायण राणे यांनी वारंवार सांगितले. परंतु प्रत्यक्षात या हुतात्म्यांनी हे बलिदान विदर्भ महाराष्ट्रात यावा यासाठी नव्हे तर मुंबई गुजरातला न जाता राज्यात यावी यासाठी केले होते. त्यामुळे राणे यांचा दावाच चुकीचा आहे, अशी अ‍ॅड.मुकेश समर्थ यांनी स्पष्टोक्ती केली. अकोला कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी , शांततेने आंदोलन करणारे ११३ शहीद गोवारी हे खरे हुतात्मे आहेत. त्यांचे विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांना स्मरण होऊ नये ही दु:खाची बाब आहे. विदर्भाचा विकास करण्यात अपयश आलेल्या कॉंग्रेसकडे प्रचाराचे ठोस मुद्दे नाहीत. विदर्भाबाहेर तरी मत मिळावे यासाठी कॉंग्रेसने अखंड महाराष्ट्राची भूमिका घेतली आहे, असे मत अ‍ॅड. समर्थ यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)