शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

नावाचीच ‘स्टार’ बाकी बेकार !

By admin | Updated: August 12, 2015 03:45 IST

महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ राहिल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार

नागपूर : महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ राहिल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार झाल्या आहेत. सोमवारी आरटीओने जप्त केलेल्या १६ बसेसच्या ‘तपासणी प्रतिनिवेदनावरून’ पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे. यामुळे ज्या बसेस रस्त्यावर धावत आहेत त्या धोकादायक आहेत. यातच थकीत कर न भरता शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्या या बसवर महापालिकेची कृपादृष्टी कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जेएनएनयुआरएम (जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान मिशन) अंतर्गत महापालिकेला २४० बस मिळाल्या होत्या. २३० बस वंश निमयने खरेदी केल्या होत्या. या ४७० बसपैकी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दरवर्षी केवळ २३० बसेस योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्रासाठी येतात. ही संख्या शहरातील प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत फार तोकडी आहे. यामुळे एका बसला दिवसभरात साधारण दहावर फेऱ्या माराव्या लागतात. परिणामी काही महिन्यातच या बसेस नादुरुस्त होतात. मात्र, वंश निमय मोठ्या दुरुस्तीचा खर्च करीत नसल्याने आहे त्या स्थितीत प्रवाशांचा जीव धोक्यात घेऊन या बसेस धावत असल्याचे चित्र आहे. सोमवारी आरटीओने ज्या १६ बसवर कारवाई केली त्यात प्रत्येक बसमध्ये आरटीओच्या वायुपथकाला १२ ते १५ त्रुटी आढळून आल्या. दार तुटलेले ४सोमवारी जप्त करण्यात आलेल्या सर्वच स्टार बसमधील दारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक दारे बंद-चालू होत नाही. काही दारांना तारेने बांधलेले आहे तर काहींना खालून विट लावून उभ्या केलेल्या आहेत. विशेष म्हणजे, जेएनएनयुआरएमने दिलेल्या बसेसमधील दारे स्वयंचलित होती, परंतु त्यांचीही अवस्था इतरांसारखीच झाल्याचे बसचे कर्मचारी सांगतात. कुशन नसलेली आसने४शहरातील रस्त्यांवर धावत असलेल्या बहुसंख्य स्टार बसमधील आसने तुटलेल्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, सर्वच बसमधील आसनांना कुशनच नाही. कडक प्लास्टिकवर प्रवाशांना बसावे लागते. काहींना तर भोके पडलेली आहेत तर काहींचे लोखंड बाहेर निघाले आहे. या अवस्थेतही प्रवासी बसतात.