शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोट्यवधींच्या जमिनीवर चढले नासुप्रचे नाव

By admin | Updated: July 2, 2016 03:11 IST

नागपूर सुधार प्रन्यासने १९६१ मध्ये अधिग्रहीत केलेली सुमारे १७ एकर जमीन शेतमालकाच्या वारसांनी भूमाफियाशी हातमिळवणी करून परस्पर विकली.

भूमाफियांना चपराक : अधिकाऱ्यांच्या लढ्याला यशनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने १९६१ मध्ये अधिग्रहीत केलेली सुमारे १७ एकर जमीन शेतमालकाच्या वारसांनी भूमाफियाशी हातमिळवणी करून परस्पर विकली. नासुप्रच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी जमीन परत मिळविण्यासाठी कायदेशीर लढा दिला. त्या लढ्याला शेवटी यश आले. आता संबंधित जमिनीच्या सातबारावर नासुप्रची नोंद करण्यात आली आहे. भूमाफियांना ही एक मोठी चपराक मानली जात आहे.मौजा बहादुुरा येथील प.ह.नं.३५, नागपूर ग्रामीण खसरा नं. १२, क्षेत्र ६.८५ हे.आर. (१६.९२ एकर ) जमीन नागपूर सुधार प्रन्यासने ड्रेनेज तसेच सिवरेज स्कीम भाग- २ अंतर्गत १९६१ मध्ये जमीन मालक पीरबा श्रावण कुणबी यांच्याकडून अधिग्रहीत करण्यात आली होती. १९६३ मध्ये या जमिनीचा अवॉर्ड करण्यात आला. १९६५ मध्ये संबंधित जमिनीचा नासुप्रला ताबा देण्यात आला. मात्र, पटवारी रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली नाही. जमीन मालक पीरबा श्रावण कुणबी यांच्या वारसदारांनी नेमका याचा फायदा घेतला. भूमाफियांशी हातमिळवणी करून संबंधित जमीन उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट, बहादुरा यांना विकली. सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन सभापती सचिन कुर्वे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, कार्यकारी अभियंता संदीप बापट, देवेंद्र गौर यांची टीम तयार करून जमीन परत मिळविण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान नासुप्रची बाजू भक्कम करणारी कागदपत्रे सादर करण्यात आली. १८ मे २०१६ रोजी नासुप्रच्या बाजूने निर्णय लागला व संबंधित जमिनीच्या सातबारावर नासुप्रचे नाव नोंदविण्यात यावे, असा आदेश पारित करण्यात आला. त्यानुसार सातबारावर नासुप्रचे नाव नोंदविण्यात आले आहे. नुकतेच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांनी नासुप्रचे कार्यकारी अभियंता, मूल्यांकन विभाग यांच्याकडे नासुप्रचे नाव नोंदविलेला सातबारा सोपविला. नासुप्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले व कोट्यवधीची जमीन नासुप्रला परत मिळाली. या प्रकरणाच्या निमित्ताने भूमाफियांना मोठी चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)