शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे तलावात उडी मारून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:36 IST

suicide Nagpur News दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आणि मानसिक अवस्था ठीक नसलेल्या एका तरुणीने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देमध्यरात्री घेतली उडी 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आणि मानसिक अवस्था ठीक नसलेल्या एका तरुणीने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली.

‌भाग्यश्री ऊर्फ पल्लवी सुनीलराव देशमुख (वय २९) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती गणेशपेठमध्ये राहत होती. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ती घरून निघून गेली. त्यामुळे पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. ती यापूर्वीही अशाच प्रकारे घरून निघून गेली होती. तिचा मृतदेह गांधीसागर तलावात तरंगत असल्याचे पालकांना कळाले. त्यामुळे पालकांनी तिकडे धाव घेतली. समाजसेवक दाम्पत्य जयश्री आणि जगदीश खरे यांनी तेवढ्या रात्री पल्लवीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पल्लवीचा मृतदेह मेडिकलला पाठविला. गुरुवारी सकाळी पल्लवीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले.

त्यांच्या माहितीनुसार पल्लवीला मानसिक आजार होता. तिच्यावर उपचारही सुरू होते. ती मानसिक अवस्था बिघडल्यानंतर कधीही घरून निघून जात होती. गुरुवारी रात्री अकरा वाजता घरच्यांचे लक्ष नसल्याचे पाहून ती घरून निघून गेली. तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, पल्लवीचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गुजरातमध्ये तिचे सासर होते. लग्न झाल्याच्या काही दिवसानंतर पल्लवी आणि तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरच्यांना फोन करून बोलवून घेतले आणि पल्लवीला माहेरी परत पाठवले. तेव्हापासून ती नागपुरातच राहत होती, अशी माहिती पल्लवीच्या पालकांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद कोल्हारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या