शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रात्रभर जागणार!

By admin | Updated: July 1, 2016 03:05 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नाईटलाईफला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार नवीन आदर्श गुमास्ता कायद्यांतर्ग

थिएटर, हॉटेल्स, दुकाने, बँका अहोरात्र खुली राहणार : व्यावसायिकांचा फायदानागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नाईटलाईफला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार नवीन आदर्श गुमास्ता कायद्यांतर्गत थिएटर, हॉटेल्स, दुकाने, बँकांना अहोरात्र उघडी ठेवण्यात मुभा मिळणार आहे. या निर्णयामुळे रस्त्यांवर चहलपहल वाढून नागपूर रात्रभर जागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची उलाढाल वाढून तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाचे विविध सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.शासनाच्या महसुलात वाढ होणारसर्व प्रतिष्ठाने अहोरात्र सुरू राहणार असल्यामुळे व्यावसायिकांची उलाढाल वाढून शासनाच्या तिजोरीत कर स्वरूपातील महसुलात वाढ होईल. त्याचा राज्याच्या विकासात हातभार लागणार आहे. एवढेच नव्हे तर विजेची मागणी वाढल्यामुळे महावितरणला फायदा होणार आहे. एकंदरीत पाहता या निर्णयामुळे उलाढालीच्या आधारावर शासनाचा महसूल वाढणार आहे. पोलिसांची जबाबदारी वाढणारप्रत्येक घडामोडीला चांगली अन् वाईट अशा दोन बाजू असतात. काही नुकसान होते तर काही फायदेही होतात. रात्रभर दुकाने, मॉल्स, बँका तसेच इतर आस्थापना उघड्या राहिल्याने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध असतील. मात्र, सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित होईल. पोलिसांना अधिक सतर्कपणे काम करावे लागेल, असे मत निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. अंकुश धनविजय यांनी व्यक्त केले. अनेकदा रस्त्यावर वर्दळ दिसली की गुन्हेगार गुन्हा करण्याची हिंमत दाखवत नाही. ‘नाईट लाईफ’मुळे रस्त्यावर वर्दळ वाढेल. रोजगाराच्या नवीन संधीकेंद्राच्या निर्णयामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. दोन पाळीत काम करून अनेकांना उत्पन्न वाढविता येणार आहे. याशिवाय तरुण-तरुणींना शिक्षणासोबतच उत्पन्नासाठी रोजगाराची द्वारे खुली होणार आहे. तरुणांना रेस्टॉरंट, दुकाने, थिएटर, मॉल या ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ आणि फावल्या वेळात रोजगार मिळणार आहे. व्यावसायिकांची उलाढाल वाढणाररेस्टॉरंट, दुकाने, मॉल रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. पण आता आदर्श गुमास्ता कायद्यामुळे सर्व प्रतिष्ठाने अहोरात्र सुरू राहतील. त्यामुळे व्यावसायिकांची उलाढाल वाढणार आहे. एखाद्याला दुपारी खरेदी शक्य न झाल्यास त्याला रात्री खरेदी करता येईल. त्यामुळे मॉल संस्कृती वाढणार असून त्याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे गोदामे आणि पॅकेजिंगचे काम चालणाऱ्या ठिकाणी रात्रीच्या वेळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. महिलांनाही रात्रपाळीत काम करता येणार आहे.