शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

नागपूरच्या कुलगुरूंना मुदतवाढ मिळण्याची शक्यता : सोमवारी निर्णयाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 00:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात राजभवनात नियम व कायद्यातील तरतुदींसंदर्भात पडताळणी केली जात आहे.

ठळक मुद्देनव्या कुलगुरूंच्या नियुक्तीपर्यंत राहू शकतो पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात राजभवनात नियम व कायद्यातील तरतुदींसंदर्भात पडताळणी केली जात आहे. सोमवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. काणे यांचा कार्यकाळ ७ एप्रिलला संपणार आहे.महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ नुसार, विद्यापीठांच्या कुलगुरूंचा कार्यकाळ साधारण: पाच वर्षांचा ठरला आहे. मात्र या कायद्यातील तरतुदीमध्ये कार्यकाळ संपल्यावर त्यात वाढ करण्यासंदर्भात कसलाही उल्लेख नाही. कुलगुरूंचा कार्यकाळ संपल्यावर नव्या कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत जवळच्या कुलगुरूंकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात असतो. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना हा प्रभार देण्यासंदर्भात विचार सुरू होता. मात्र सध्या कोरोनामुळे सर्वच विद्यापीठांमध्ये सारखी परिस्थिती आहे. परीक्षा स्थगित झाल्या असून शैक्षणिक सत्रही डळमळीत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या कुलगुरूंकडे पदभार सोपविल्यास एका वेळी दोन विद्यापीठांचा कारभार सांभाळताना कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असल्याचे मत पुढे आल्याची सूत्रांची माहिती आहे. हे टाळण्यासाठी डॉ. काणे यांचा कार्यकाळ किमान तीन महिन्यांसाठी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू आहे. पुढील तीन महिन्यात परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. हा अवधी संपल्यावर कुण्या अन्य विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार सोपविला जाऊ शकतो. या संदर्भात डॉ. काणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही बाब फेटाळून लावली. असे असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांचा कार्यकाळ वाढविण्यावर विचार सुरू आहे.देशपांडे यांना प्रभार सोपविण्यावर प्रश्नचिन्हयापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे विद्यापीठाचे कुलगुरुपद सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. मात्र मागील वर्षी डॉ. काणे यांच्या एक महिन्याच्या रजेदरम्यान डॉ. चांदेकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. हे पाहू जाता, डॉ. देशपांडे प्र-कुलगुरू असले तरी, त्यांच्याकडे कुलगुरुपदाचा प्रभार सोपविला जाण्याची शक्यता कमीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशपांडे यांच्याकडून नियुक्तीसंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ