शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ कुलगुरू निवड समितीसाठी करंदीकर यांचे नाव निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:32 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. विद्यापीठाने कुलगुरूच्या निवडीसाठी बनविलेल्या समितीसाठी आयआयटी कानपूरचे निदेशक प्रा. अभय करंदीकर यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यापीठ व्यवस्थापन व विद्वत् परिषद यांच्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते केली निवड : कुलपती कार्यालयाला पाठविले नाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. विद्यापीठाने कुलगुरूच्या निवडीसाठी बनविलेल्या समितीसाठी आयआयटी कानपूरचे निदेशक प्रा. अभय करंदीकर यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले. त्यांचे नाव कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात आले.समितीच्या एका सदस्याची निवड करण्यासाठी सोमवारी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व विद्वत् परिषदेची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत प्रा. करंदीकर यांचे नाव व्यवस्थापन परिषदेचे वरिष्ठ सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी प्रस्तावित केले. विष्णू चांगदे यांनी त्यांच्या नावाचे अनुमोदन केले. संक्षिप्त चर्चेनंतर त्यांच्या नावाच्या प्रस्तावावर मोहोर लावण्यात आली. आता राज्यपाल व कुलपती समितीचे अध्यक्ष त्यांचे नाव निश्चित करतील. समितीत एक अन्य सदस्य म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना सहभागी केले आहे. नियमानुसार निवड समितीचे गठन झाल्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया एक महिना चालेल. पात्र उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. समितीकडून एकूण उमेदवारांपैकी पाच दावेदारांचे नाव राज्यपाल व कुलपती यांना पाठविण्यात येईल. या उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर त्यातील एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड करण्यात येईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपतो आहे. ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.बैठकीत उपस्थित नव्हते भावी उमेदवारविद्यापीठात कुलगुरू पदासाठी अनेक दावेदार आहे. या दावेदारांपैकी आजच्या बैठकीत केवळ राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांना सोडल्यास कुणीही उपस्थित नव्हते. कुलगुरू पदासाठी असलेल्या दावेदारामध्ये विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्यासह त्यांची पत्नी व अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख स्नेहा देशपांडे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मुख्य शाखेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, शासकीय विज्ञान संस्थेचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अंजली राहटगांवकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ