शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाला संशोधनापेक्षा सौंदर्यीकरणाची जास्त चिंता : ३८२ कोटींचा अर्थसंकल्प संमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर्यीकरणावर जास्त भर देण्यात आला आहे. गुरुवारी २०१९-२० या वर्षासाठी विद्यापीठाचा ३८२ कोटींचा अर्थसंकल्प सूचना व अटींसह मान्य करण्यात आला.

ठळक मुद्देसंशोधनासाठी केवळ एक कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर्यीकरणावर जास्त भर देण्यात आला आहे. गुरुवारी २०१९-२० या वर्षासाठी विद्यापीठाचा ३८२ कोटींचा अर्थसंकल्प सूचना व अटींसह मान्य करण्यात आला.विधीसभेत डॉ.विनायक देशपांडे यांनी अर्थसंकल्प मांडला. यातील २०.३८ टक्के भाग हा इमारतींच्या डागडुजीसाठी ठेवण्यात आला आहे. तर परीक्षेच्या कामांसाठी २०.३५ टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण योजनेसाठी १ कोटी ६५ लाख तर रिसर्च फेलोशिपसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रासाठी केवळ पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वसतिगृहांमधील आवश्यक सुविधांसाठी २३ लाखांची तरतूद आहे.सिंथेटिक ट्रॅक, संविधान पार्क, विविध परिसरांतील प्रवेशद्वार, सुरक्षाभिंत तसेच सौंदर्यीकरणासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी ११ कोटी तर ‘रेकॉर्ड’चे ‘डिजिटलायझेशन’ करण्यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी ‘इन्क्युबेशन सेंटर’ विकसित करण्यात येणार आहे व यासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात पहिल्यांदाच आकस्मिक खर्चासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.तूट कशी भरून काढणारमागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पातील तूट ही ४१.४४ कोटींवर पोहोचली आहे. विद्यापीठात अनेक खर्च अनावश्यक आहेत. ही तूट भरून कशी काढणार याचा कुठेही अर्थसंकल्पात उल्लेख का नाही, असा प्रश्न विधीसभेत उपस्थित झाला. डॉ.बबन तायवाडे यांनी यावर प्रशासनावर टीकादेखील केली. अनावश्यक खर्चामध्ये कपात करावी, अशी मागणी अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केली. यासोबतच इतरही सदस्यांनी सूचना दिल्या. सदस्यांचा दबाव लक्षात घेता कुलगुरूंनी सूचनांसह अर्थसंकल्पाला मान्यता दिली. याबाबतदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठBudgetअर्थसंकल्प