शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ :  अखेर चक्रधर स्वामी अध्यासनाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासंदर्भातील अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. बुधवारी अध्यासनाचे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देउद्या उद्घाटन, दीर्घकाळची प्रतिक्षा संपणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासंदर्भातील अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. बुधवारी अध्यासनाचे उद्घाटन होणार आहे. लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेच्या परिसरात स्वतंत्र इमारतीत स्थापन झालेल्या या अध्यासनाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असून आर्थिक सहकार्यही केले आहे.नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचे वाचन, संशोधन व्हावे, वेगवेगळ्या दिशांनी या साहित्यांचा अभ्यास व्हावा, यादृष्टीने महानुभाव पंथाचे जनक श्रीचक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. २०१६ साली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपूर विद्यापीठात हे अध्यासन सुरू करण्यात येईल व त्याला आर्थिक पाठबळही दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी दोन कोटी रुपयांची विशेष तरतूददेखील करण्यात आली.नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळ, विद्यापरिषद तसेच व्यवस्थापन परिषदेनेदेखील अध्यासन स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर अध्यासन उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या. ११ डिसेंबर रोजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे उपस्थित राहणार असून या प्रसंगी महानुभाव साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. लता लांजेवार मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती मार्गावरील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था परिसरातील विद्यापीठ कर्मचारी सहकारी संस्थेच्या हा कार्यक्रम होईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी दिली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ