शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; ‘कोरोना’मुळे शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:50 IST

‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देमूल्यांकन वेळेत करण्याचे राहणार मोठे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षा व नियमित परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर निकालदेखील उशीरा येतील. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. १ एप्रिलपासूनचे पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार होते. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठ ा टप्पा सुरू होणार होता.. सुमारे २८३परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते . त्यात बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी. ई., एम.टेक. (पुर वणी) व एम.ए. यांसारख्या प्रमुख व नियमित परीक्षांचा समावेश होता. आता विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. आतापर्यंत एकूण विद्यापीठाने साधारणत: साडेचारशेहून परीक्षा पुढे ढकलल्या असून यात ३ लाख विद्यार्थी सहभागी होणार होते.जर १४ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ उठला तरी विद्यापीठाला त्वरित परीक्षा आयोजित करता येणार नाहीत. साधारणत: २३ ते २५ एप्रिलपासूनच परीक्षा घेता येतील. दरवर्षी विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैपर्यंत चालतात. यंदा त्या जूनपर्यंतच होणार होत्या. त्यामुळे विद्यापीठाकडे एक महिन्याचा ‘बफर’ वेळ होता. परंतु ‘कोरोना’मुळे आता परीक्षा उशीरापर्यंच चालतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मूल्यांकन व पर्यायाने निकालांनादेखील उशीर होईल.विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’नुसार शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होते. तर जुलैमध्ये प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशांना सुरुवात होते. मात्र निकाल उशीरा लागले तर प्रवेशप्रक्रियादेखील लांबेल. अशा स्थितीत त्याचा फटका हिवाळी परीक्षांना बसू शकतो. त्यामुळे संपूर्ण ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’ कोलमडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.मूल्यांकन वेगाने पार पाडण्यावर भरउन्हाळी परीक्षा नेमक्या कधी सुरू होतील हे सर्व ‘लॉकडाऊन’ कधी उठेल यावर अवलंबून आहे. जर १४ एप्रिलला ‘लॉकडाऊन’ उठला तरी लगेच परीक्षा सुरू करणे शक्य नाही. एकूण प्रक्रियेला आठवडाभर वेळ लागेल व २५ एप्रिलनंतरच परीक्षा घेता येतील. मूल्यांकन जास्तीत जास्त वेगाने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असेल असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ