लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटकालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात अद्यापही शासनस्तरावरून कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे राज्य शासनानेच कबूल केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. विधानपरिषदेत प्रा.अनिल सोले, नागो गाणार व गिरीश व्यास यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात तावडे यांनी ही स्पष्टोक्ती केली. ‘लोकमत’ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे हे विशेष.नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून पुरातनकालीन २२४ मौलिक नाणी व अन्य वस्तू गहाळ झाल्या होत्या. या प्रकरणावर शासनस्तरावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मात्र नागपूर विद्यापीठाने तत्कालीन कुलगुरू व विभागीय आयुक्त यांनी पाच सदस्यीय समिती गठित केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालाची प्रत अंबाझरी पोलीस स्टेशनला सादर करण्यात आली असून त्या अनुषंगाने पोलिसांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येईल, असे तावडे यांच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.राजकीय दबावामुळे तपास संथ नाहीया प्रकरणात पोलीस आयुक्त के.वेंकटेशम् यांनी स्वत: पुढाकार घेत हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपविण्याची सूचना केली होती. प्रकरणाची फाईल अंबाझरी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आली. मात्र लगेच ती फाईल परत आली. शहरातील एका लोकप्रतिनिधीने तपास अंबाझरी पोलीस ठाण्याकडेच राहू द्यावा, यासंदर्भात दबाव आणला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र राज्य शासनाने या प्रकरणात कुठलाही दबाव नसल्याची भूमिका मांडली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे या प्रकरणाच्या चौकशीस दिरंगाई करण्यात येत नसल्याचे तावडे यांनी उत्तरातून स्पष्ट केले आहे.
नागपूर विद्यापीठ नाणे प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:19 IST
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटकालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात अद्यापही शासनस्तरावरून कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे राज्य शासनानेच कबूल केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. विधानपरिषदेत प्रा.अनिल सोले, नागो गाणार व गिरीश व्यास यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात तावडे यांनी ही स्पष्टोक्ती केली. ‘लोकमत’ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे हे विशेष.
नागपूर विद्यापीठ नाणे प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार
ठळक मुद्देराज्य शासनाची स्पष्टोक्ती : शासनस्तरावर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याची कबुली