शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:20 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आवश्यक प्रमाणात शिक्षक तसेच सुविधा नसणे इत्यादी कारणांसाठी १३२ महाविद्यालयांत प्रवेशबंदी लावली होती. परंतु आता यातील ३१ महाविद्यालयांवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देआवश्यक सुविधांची पूर्तता केल्याने निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आवश्यक प्रमाणात शिक्षक तसेच सुविधा नसणे इत्यादी कारणांसाठी १३२ महाविद्यालयांत प्रवेशबंदी लावली होती. परंतु आता यातील ३१ महाविद्यालयांवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक सुविधांची पूर्तता केल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठात अनेक महाविद्यालयांत नियमांची पूर्तता होत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. निरंतर संलग्निकरणाची प्रक्रिया न राबविणे, आवश्यक प्रमाणात शिक्षक नसणे तसेच पायाभूत सुविधांचा अभाव या कारणांनी विद्यापीठाने १७ मे रोजी १२९ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावली होती. त्यानंतर काही दिवसांतच आणखी तीन महाविद्यालयांवर बंदी लावण्यात आली. ऐन प्रवेशांच्या अगोदर विद्यापीठाने हे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाला होता. या कारवाईमुळे जाग आलेल्या काही महाविद्यालयांनी नियमित शिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. यासंदर्भातील मान्यतेचे प्रस्तावदेखील विद्यापीठाकडे पाठविण्यात आले. तर २० महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आवश्यक सुविधांची पूर्तता व शिक्षकांची नियुक्ती झाल्यावर त्यांच्यावरील प्रवेशबंदी उठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या महाविद्यालयांसह या इतर ११ महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता केल्याने त्यांच्यावरील प्रवेशबंदी हटविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.संकेतस्थळावर यादी नाहीचप्रवेशबंदी लावण्यात आली असताना विद्यापीठाने संकेतस्थळावर सर्व महाविद्यालयांची यादी टाकली होती. परंतु ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटवत असताना विद्यापीठाने संकेतस्थळावर यादी टाकण्याची तसदी घेतलेली नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcollegeमहाविद्यालय