शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांची पाण्याची चिंताच मिटली, तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत सप्टेंबर महिन्यात वरुणराजाने कृपा केल्याचे चित्र असून धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. महत्त्वाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत सप्टेंबर महिन्यात वरुणराजाने कृपा केल्याचे चित्र असून धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व कामठी खैरी या धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवणार नाही.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तोतलाडोह व कामठी खैरीतील जलसाठा ७२.०२ व ५९.५७ टक्क्यांवर पोहोचला होता. चारच दिवसात यात वाढ झाली व सोमवारी ही टक्कवारी अनुक्रमे ८०.११ व ६६.५६ टक्के इतकी झाली. तोतलाडोहच्या पाणीसाठ्यात चारच दिवसांमध्ये आठ टक्क्यांची भर पडली. तोतलाडोहची क्षमता १,०१६.८८ दलघमि इतकी असून आतापर्यंत ८१४.६७ पाणीसाठा जमला आहे. मागील वर्षी यात तारखेला तोतलाडोहमध्ये ९४.६६ टक्के पाणीसाठा होता.

पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता

मध्यप्रदेशात पेंच नदीवर बनविण्यात आलेल्या चौराई धरणाचा पाणीसाठा ८२.१८ टक्के इतका झाला आहे. तेथे आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तोतलाडोहमधील पाणीसाठ्यात देखील वाढ होईल.

नागपूर जिल्ह्यातील जलसाठा

मोठे प्रकल्प : टक्केवारी

तोतलाडोह : ८०.११

कामठी खैरी : ६६.५६

खिंडसी : ४९.६०

लोअर नांद : ७२.००

वडगाव : ९०.३२