शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:36 IST

लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.फळांचे भाव लॉकडाऊनपूर्वी (कि़ रु.)         लॉकडाऊननंतर (कि़ रु)सफरचंद १८० ते २००                                २०० ते २२०मोसंबी ५० ते ६०                                      ६० ते ८०डाळिंब १४० ते १६०                                   १६० ते १८०संत्री (डझन) ५० ते ७०                            ६० ते ८०पायनॅपल ५० ते ६०                                 ४० ते ५०पपई ४० ते ५०                                        ३० ते ४०केळी (डझन) ४० ते ५०                          ४० ते ५०या कारणांमुळे वाढले भावलॉकडाऊनपूर्वी ठोक बाजारात टोमॅटोची आवक जास्त होती. भाव ५ रुपये किलो होते. किरकोळ बाजारात ७ ते १५ रुपयांपर्यंत विक्री व्हायची. कमी भावामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची माल वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतातच नष्ट केला. शिवाय पुन्हा लागवडही केली नाही. लॉकडाऊननंतर आवक अल्पशी असल्याने किरकोळमध्ये भाव ६० ते ७० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे शहरातच्या विविध बाजारात कमी किमतीत माल विकून शेतकरी गावाकडे परत जायचे. जवळपास अडीच महिने शेतकऱ्यांना तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागली. आता लागवड कमी असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत.लिंबाच्या भावातही वाढकोरोनावर मात करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबूचा रस रोज पिण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्याने प्रत्येकाने लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे एरवी १० रुपयांत ४ नग मिळणारे लिंबू ५ रु. वा १० रुपये नगाप्रमाणे विकले गेले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे.संपदा सोनी, गृहिणी.कोरोनामुळे बाहेरच्या राज्यातून फळांची आवक कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांना जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे फळांचे भाव वाढले आहेत.दुर्गाप्रसाद चौधरी, फळांचे व्यापारी.स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक थांबल्याने कळमन्यातून जास्त भावात भाज्यांची खरेदी करून किरकोळमध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.संतोष लांबट, भाजीपाला विक्रेते.खरीपाच्या हंगामात शेतकरी गुंतल्याने भाज्यांची लागवड कमी केली. आता पेरणी आटोपली असून भाज्यांची लागवड सुरू झाली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भाज्या बाजारात येतील.कवडू आंबटकर, शेतकरी.मुसळधार पावसाने कोथिंबीर खराबमान्सूनच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कोथिंबीर खराब झाले. त्यामुळे बाजारात आवक अल्प झाल्याने भाव वाढले. २५ ते ३० रुपये किलोचे कोथिंबीर ५० रुपयांवर पोहोचले. नवीन कोथिंबीर येण्यास दोन महिने लागतील. सध्या नाशिक व संगमनेर येथून आवक सुरू आहे.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई