शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळातील भूकंपाने मोडला नागपूर पोलिसांचा डाव

By admin | Updated: May 2, 2015 02:19 IST

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत.

जगदीश जोशी नागपूरनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत. या माहितीने नेपाळकडे निघालेल्या शहर गुन्हे शाखा पोलीस पथकाला विध्वंसक भूकंपामुळे आपली मोहीम सोडून सीमेवरूनच परत फिरावे लागले. शहर पोलिसांची वेगवेगळी पथके तब्बल एक महिन्यांपासून पाचही गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. अनेक शहरे त्यांनी पालथी घातली आहेत. परंतु त्यांना अद्यापही यश आलेले नाही. ३१ मार्च २०१५ च्या पहाटे कारागृहातील बडी गोल बराक क्रमांक ६ मधून खतरनाक गँगस्टर राजा गौस याचे साथीदार सत्येंद्र गुप्ता, मोहम्मद शोऐब ऊर्फ शिबू खान, बिसेनसिंग उईके, याच बराकीतील त्यांचे साथीदार आकाश ऊर्फ गोलू ठाकुर आणि प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, असे पाच जण पळून गेले. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांच्याकडे सोपविला.सीमेवरही मिळाली नाही खबरसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना भारत आणि नेपाळ सीमेवर पलायन केलेल्या या आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार होती. फरार आरोपींपैकी खत्री हा नेपाळचा रहिवासी आहे. अचानक भूकंप आला. त्याबरोबरच या पोलिसांना ज्या सूत्रांकडून ही माहिती मिळणार होती, ते धुसर झाले. मोक्का कारवाई अडलीजेल ब्रेक प्रकरणानंतर संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई होणार होती. परंतु ही कारवाई आता अडली आहे. याचसाठी पोलिसांनी गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मोक्का प्रकरणात दोषी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आरोपी केले जाऊ शकते.