शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

१०४३ गुन्हेगारांना दत्तक घेणार नागपूर पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:53 IST

गुन्हेगारांवर प्रत्येक वेळी पाळत राहावी, या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजनेला प्रभावी करण्यात आले आहे. पोलिसांनी टॉप टेन गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात अनेक गुन्हेगार एकटे किंवा टोळी बनवून सक्रिय आहेत. पोलिसांनी शहरातील १०४३ गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे. या गुन्हेगारांना पोलीस दत्तक घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवणार आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष : संपत्तीवरही ठेवली जाईल नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांवर प्रत्येक वेळी पाळत राहावी, या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजनेला प्रभावी करण्यात आले आहे. पोलिसांनी टॉप टेन गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात अनेक गुन्हेगार एकटे किंवा टोळी बनवून सक्रिय आहेत. पोलिसांनी शहरातील १०४३ गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे. या गुन्हेगारांना पोलीस दत्तक घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवणार आहे.सराईत गुन्हेगार हे खून, अपहरण, खंडणी वसुली यासारख्या गुन्ह्यांसह संघटितपणे दहशतसुद्धा निर्माण करीत असतात. ते दारू व मादक पदार्थाची तस्करी, जुगार अड्डे आणि मटकेही चालवतात. अवैध धंद्यांमुळे गुन्ह्यांचा ग्राफ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खूप वर्षांपूर्वी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली होती. परंतु मागील काही वर्षांपासून ही योजना थंडबस्त्यात पडली होती. गुन्हे शाखेने त्याला प्रभावीपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत गुन्हे शाखा आणि सर्व झोनला १०४३ गुन्हेगारांची माहिती पाठविण्यात आली आहे. या गुन्हेगारांची नियमित चौकशी केली जाईल. शेजारी आणि मित्रांकडून त्यांच्यासंबंधात माहिती घेतली जाईल. हे गुन्हेगार काही चुकीचे काम करीत आहेत का, अवैध धंदे चालवताहेत की नाही, याची माहितीसुद्धा गोळा केली जाईल. पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांमध्ये सुरू असलेली भांडणे, वैमनस्य, वाद याची माहिती गोळा करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासही सांगण्यात आले आहे. भरवशाच्या गुन्हेगारास पोलिसांचा खबऱ्या बनवण्यासही तयार करण्यास सांगण्यात आले आहे.पोलीस कर्मचाऱ्यांना सक्रिय गुन्हेगारांच्या वाहनांची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यांच्या कर्माच्या स्रोतांची माहितीसुद्धा मिळविण्यात येईल. पोलीस गुन्हेगारांचे ‘क्रिमिनल डोजियर’ तयार करून त्यांच्या बैठकीवरही लक्ष ठेवणार आहे. या योजनेमुळे गुन्हे नियंत्रणात येतील, असा पोलिसांना विश्वास आहे. गुन्हेगार दत्तक योजना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अपर आयुक्त नीलेश भरणे आणि उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात चालवण्यात येईल.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस