शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

शरद मिरे भिवापूर : नागपूर-नागभीड नॅरोगेजला नवा ‘लुक’ देण्यासाठी शासनाने ब्रॉडगेजची घोषणा केली. वर्षानुवर्षे हवेत असलेल्या या घोषणेची आता ...

शरद मिरे

भिवापूर : नागपूर-नागभीड नॅरोगेजला नवा ‘लुक’ देण्यासाठी शासनाने ब्रॉडगेजची घोषणा केली. वर्षानुवर्षे हवेत असलेल्या या घोषणेची आता आश्वासनपूर्तीकडे वाटचाल सुरू असून, ब्रॉडगेजच्या कामाला गती आली आहे. नॅरोगेजचे रुळ काढत, खोदकाम व सपाटीकरणाचे काम सुरू आहे. ब्रॉडगेज निर्मितीच्या जलदगतीमुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. १९१३ पासून या मार्गाने नागपूर-नागभीड रेल्वेगाडी धावते. हा नॅरोगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेज व्हावा, अशी मागणी सर्वप्रथम १९५२ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर थंडबस्त्यात असलेल्या या मागणीने मध्यंतरीच्या काळात पुन्हा जोर धरला. पण पुढे काहीच झाले नाही. दरम्यान, ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी हा मार्ग ब्रॉडगेज करण्याची घोषणा केली. मात्र अनेक वर्ष ही घोषणा हवेत होती. त्यानंतर केंद्र व राज्य शासनातील निधीचा तिढा सुटताच ब्रॉडगेज निर्मितीच्या कामाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला. रेल्वे विभागाने नागपूर-नागभीड रेल्वेमार्गावर धावणाऱ्या ‘शकुंतला एक्स्प्रेस’ची चाके थांबविण्याचा निर्णय घेतला. २५ नोव्हेंबर २०१९ पासून शकुंतलाचा प्रवास थांबला. मात्र ज्या कामासाठी ही रेल्वे बंद करण्यात आली, त्या ब्रॉडगेज निर्मितीच्या कामाला वर्षभरात हात लागलेला नव्हता. मात्र गत सहा महिन्यापासून नागपूर-कुही-उमरेड-भिवापूर- नागभीड या चारही भागात ब्रॉडगेज निर्मितीच्या कामाने वेग धरला आहे.

आतापर्यंत काय झाले

गत सहा महिन्यापासून ब्रॉडगेज निर्मितीच्या कामाने वेग घेतला आहे. काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत भिवापूर परिसरात पूर्वीच्या रेल्वेलाईनवरील नॅरोगेजचे संपूर्ण गेज (रुळ) काढण्यात आले आहेत. ‘गेज’ असलेल्या उंच मार्गाचे सपाटीकरण करण्यात येत आहे. भिवापूर शहर चार भागात वसले असून, यातील दिघोरा व भूदान या दोन प्रभागात जाण्याकरिता रेल्वेलाईन क्रॉस करावी लागते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. यातील दिघोरा रेल्वे क्रॉसिंगवर पुलाचे खोदकाम सुरू झाले आहे.