शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाच्या नाले स्वच्छता मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:47 IST

शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांची स्वच्छता प्रारंभ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांची स्वच्छता प्रारंभ होत आहे. त्यापैकी पाच झोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३१ मे पर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.शहरातील दहाही झोनअंतर्गत २२७ नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्यांच्या परिसरात राहणाºया नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला . त्यांच्या निर्देशानुसार स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे. नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद मुंढे यांनी व्यक्त केला.सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या १३३ नाल्यांची पाच पोकलेनद्वारे स्वच्छता केली जात आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि ११ टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहे. यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयातून स्वच्छता केली जात आहे.नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.१० झोनमध्ये २२७ नालेमनपा हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२, धरमपेठ ३५, हनुमाननगर १४, धंतोली १४, नेहरुनगर १५, गांधीबाग ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज सात, आशीनगर १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरित नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका