शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

नागपूर-मुंबई एसी व्हॉल्वो बस

By admin | Updated: December 8, 2014 00:52 IST

पुण्याला आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. यामुळेच या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल असल्याचे दिसते. खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक तर दिवाळीच्या काळात

प्रवाशांसाठी सुविधा : पुण्याच्या प्रवाशांसाठी सुवर्णसंधीनागपूर : पुण्याला आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. यामुळेच या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल असल्याचे दिसते. खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक तर दिवाळीच्या काळात पुण्याचे भाडे तीन हजार आकारतात. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने पुणेमार्गे वातानुकूलित व्हॉल्वो बससेवा सुरू केली असूून, महामंडळाच्या नागपूर विभागाचे यंत्र अभियंता गजानन नागुलवार यांनी फित कापून या फेरीचे उद्घाटन करून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली.नागपुरातून एकही व्हॉल्वो बस नसल्याची तक्रार प्रवासी मागील अनेक दिवसांपासून करीत होते. यात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून तर खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत होते. नाईलाजास्तव प्रवाशांना जादा रक्कम मोजून प्रवास करावा लागत होता. परंतु आता एसटी महामंडळाने नागपूर-मुंबई एसी व्हॉल्वो बस उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांची मोठी सुविधा झाली आहे. ही गाडी कारंजा, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, चिखली, देऊळगाव, जालना, सिडको, औरंगाबाद, वाळुंज, तारकपूर, अहमदनगर, शिरुर, पुणे, वाकड, कळंबोली, खारघर, सीबीडी, नेरुळ, वाशी हायवे, मैत्री पार्क, कुनेन, दादर या मार्गाने मुंबईला पोहोचणार आहे. बससेवेच्या शुभारंभप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहेत्रे, उपयंत्र अभियंता राजेंद्र ठाकरे, आगार व्यवस्थापक सिद्धार्थ गजभिये, प्रमोद झाडे, वाहतूक अधीक्षक सतीश अपराजित, गुणवंत तागडे, सहायक वाहतूक निरीक्षक अजय हटेवार, सुनील झोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागपूरवरून विविध ठिकाणचे प्रवासभाडेकारंजा - १९० रुपये, तळेगाव - २५३ रुपये, अमरावती ३९५ रुपये, मूर्तिजापूर ५५३ रुपये, अकोला - ६६४ रुपये, खामगाव - ७९० रुपये, चिखली - ९४८ रुपये, देऊळगाव - ११०६ रुपये, जालना - ११६९ रुपये, सिडको - १३२७ रुपये, औरंगाबाद - १३४३ रुपये, वाळुंज १३९० रुपये, तारकपूर - १६४३ रुपये, अहमदनगर - १६४३, शिरुर - १७७० रुपये, पुणे - १९५९ रुपये, वाकड - १९९१रुपये, कळंबोली - २२५९, खारघर - २२७५, सीबीडी २२७५, नेरुळ २२९१ रुपये, वाशी हायवे - २३०७ रुपये, मैत्री पार्क - २३३८ रुपये, कुनेन २३३८ रुपये, दादर - २३५४ रु., मुंबई - २३७० रु.