शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रोचा प्रवासी आकडा १३ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

- कोविड नियमांचे पालन : स्टेशन व गाड्यांची वारंवार स्वच्छता नागपूर : महा मेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी आणि स्थानकांवर ...

- कोविड नियमांचे पालन : स्टेशन व गाड्यांची वारंवार स्वच्छता

नागपूर : महा मेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी आणि स्थानकांवर घेतलेल्या कोविड सुरक्षा उपायांमुळे नागपूरकरांचा विश्वास पुन्हा एकदा कायम झाला आहे. त्यामुळे मेट्रोची राईडशिप वाढली आहे. २० जून रोजी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन्सचा एकत्रित प्रवासी आकडा १३ हजारांवर गेला आहे.

लॉकडाऊन कालावधीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. ५ जून रोजी ७६१ लोकांनी मेट्रोचा वापर केला होता. अनलॉक झाल्यावर पहिल्या दिवशी ७ जूनला आकडेवारी ४१५३ वर गेली. तर १३ जूनला ९५०० वर पोहोचली.

लॉकडाऊनदरम्यान दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या एक तास अवधीने होत्या. ७ जूनपासून ते ३० मिनिटांच्या अवधीपर्यंत वाढविण्यात आल्या. सध्या अ‍ॅक्वा लाईनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) सकाळी ६.३० ते सायंकाळी ८ दरम्यान आणि ऑरेंज लाईनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी) सकाळी ८ सायंकाळी ८ पर्यंत गाड्या धावतात.

मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी सर्व गाड्या व स्थानकांची स्वच्छता करण्यात आली. दिवसभर नियमित अंतराने निर्जंतुकीकरण करण्यात येते. गाड्या व स्थानकांवर अधिक स्पर्श होणाऱ्या भागांची वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. कर्मचाऱ्यांनी देऊ केलेल्या चलनी नोटा अल्ट्रा-व्हॉयलेट किरणांचा वापर करून निर्जंतुक करण्यात येतात आणि त्या स्वतंत्रपणे ठेवून प्रवाशांना देण्यासाठी उपयोग केला जातो. विविध प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या सुरक्षेसंबंधी सूचना नियमितपणे प्रवाशांपर्यंत फलकांद्वारे आणि कर्मचाऱ्यांद्वारे पोहोचविण्यात येतात. कोविडची जनजागृती स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सार्वजनिक घोषणा सिस्टीमवर नियमित घोषणा केल्या जातात. प्रवाशांच्या माहितीसाठी मेट्रो स्थानकांवर स्टँड आणि माहिती बोर्ड लावण्यात आलेले आहेत.

तारीख रायडरशिप

५ जून ७६१

७ जून४,१५३

१३ जून ९,५००

१९ जून८,६४७

२० जून१३,५००