नागपूर : शहरातील किमान तापमानाचा पारा सध्या १५.४ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. दिवसा उन असले तरी सायंकाळनंतर मात्र गारवा जाणवत आहे. मागील एक-दोन दिवसापासून शहरातील सायंकाळच्या वातावरणात कमी-अधिक बदल जाणवत आहे. त्याचा परिणाम रात्रीच्या तापमानावर पडताना दिसत आहे.
नागपुरातील किमान तापमान गेल्या २४ तासात १.२ अंशाने वाढले आहे. असे असले तरी सायंकाळनंतर पारा बराच खालवलेला जाणवला. सकाळी आर्द्रता ६० टक्के नोंदविली गेली,तर सायंकाळी ३२ टक्के नोंद झाली. दृष्यता २ ते ४ किलोमीटर होती. कमाल तापमानाची नोंद ३३.३ अंश सेल्सिअस करण्यात आली, येथेही पारा २ अंशाने वाढल्याचे नोंदीवरून दिसत आहे.
अमरावतीमध्ये सर्वात कमी म्हणजे १३.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर बुलडाणामध्ये सर्वात अधिक म्हणजे १८.२ अंश तापमान नोंदविले गेले. नेहमी कमी तापमान असणाऱ्या गोंदियात शनिवारी १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गडचिरोलीत १३.८ तर वर्धामध्ये १५.९ अंश तापमान नोंदविले गेले. तर यवतमाळमध्ये १६ अंश तर अकोला व चंद्रपुरात अनुक्रमे १६.२ आणि १६.६ अंश तापमानाची नोंद झाली.