शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात ३,९९६ गावांची आणेवारी ५० पैशाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

नागपूर विभागामध्ये ६२ तालुके असून त्यापैकी ३२ तालुक्यांमधील गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत आणेवारी दाखविण्यात आली आहे. यातील अनेक तालुके ...

नागपूर विभागामध्ये ६२ तालुके असून त्यापैकी ३२ तालुक्यांमधील गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत आणेवारी दाखविण्यात आली आहे. यातील अनेक तालुके अंशत: आहेत. नागपूर जिल्ह्यात दोन तालुके ५० टक्क्यांखाली दिसत असले तरी दोन्ही तालुके मिळून गावे मात्र २८ दाखविली आहेत. असाच प्रकार गोंदिया, भंडारा जिल्ह्यांतही घडला आहे. परिणामत: आणेवारी काढताना अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

सध्याची पीक परिस्थिती

विभागातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत पुराचा तडाखा बसला होता. यामुळे अर्थातच नुकसान मोठे आहे. सध्या तूर, कपाशीवर कीड आहे. कपाशीवर सर्वत्र बोंड अळीचा प्रदुर्भाव आहे. भाजीपाला पिकावरही कीड असून तुरीच्या शेंगा गळत आहेत.

...

दुष्काळाच्या घोषणेत अडसर

महसूल विभागाच्या या आकडेवारीमुळे दुष्काळाची घोषणा करण्यात अडसर आहे. अनेक तालुक्यांत अंशत: गावांचा समावेश झाल्याने संपृूर्ण तालुक्यावर अन्याय होऊ शकतो.

...

शासनाकडून अपेक्षित मदत

आणेवारी कमी आलेल्या गावांना शेतसारा माफ होऊ शकतो, वीज बिलात ३३ टक्के सवलत, उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते, तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शु्ुल्क माफ होऊ शकते.

...

घोषित मदत अल्पच

वर्षभरात शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुनर्गठन वगळता अन्य मदत पुरेशी पोहोचली नाही. पीक विमा तसेच पूरग्रस्त निधीचीही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे मागणी आणि प्रतीक्षा सुरूच आहे.

...

अशी आहे स्थिती

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापूर्वीच जाहीर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशीचा पेरा कमी करून सोयाबीनमध्ये वाढ झाली असली तरी पावसाचा मोठा फटका बसला. शेंगा न भरल्याने उतारी आली नाही. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडातील शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता.

...

विभागातील गावांची पैसेवारी

जिल्हा - ५० आतील - ५० वरील

(कंसात तालुक्यांची संख्या दर्शविण्यात आली आहे)

भंडारा - (३) ६३६ - (४)२०८

चंद्रपूर - (१०) १५११ - (२) ३४५

गडचिरोली - (१२) १३३७ - (२) १५६ - ०.६३

वर्धा - (३) ४६३ - (५)८७५

गोंदिया - (२)२१- (६) ८९९

नागपूर - (२ अंशत:) २८ - (११) १७६१

एकूण - (३२) ३९९६ - (३०) ४२४४

...