शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरच देतील ‘स्मार्ट सिटी’च्या टीप्स

By admin | Updated: November 26, 2015 03:22 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांच्या सहभागाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील भाग ‘अ’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

भाग २ (ब) आजपासून : पुनर्विकासाबाबत जाणून घेणार विविध संकल्पनानागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांच्या सहभागाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील भाग ‘अ’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज गुरुवारी दुसऱ्या टप्प्याच्या भाग २ (ब) ला सुरुवात होत आहे. दोन दिवसात रेट्रोफिटिंंगसाठी (पुनर्निर्माण) रिडेव्हलपमेन्ट (पुनर्विकास)यावर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी महापालिका अभियान राबविणार असल्याची माहिती उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटीतील पुनर्निर्माण व पुनर्विकास यासाठी प्रस्तावित प्रकल्पाची माहिती देण्यात येईल. हा प्रस्ताव मान्य की अमान्य आहे, असा साधा प्रश्न नागरिकांना विचारला जाईल. याशिवाय पहिल्या टप्प्यात स्वच्छतेला प्राधान्य देतानाच शहरातील नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला. त्यामुळे नागरिक ांचा सहभाग टप्पा दोन (क) यात सुरक्षेबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येईल. स्मार्ट सिटीसाठी उपराजधानीतील नागरिकांच्या संकल्पना मागितल्या होत्या. यात १३६५ संकल्पना प्राप्त झाल्या. तीन परीक्षकांनी यातील २० उत्कृष्ट संकल्पनांची निवड केली आहे. या संकल्पनांचे बुधवारी सादरीकरण करण्यात आले. या संकल्पना नागरिकांपुढे मांडण्यात येणार आहेत. परीक्षकांचे ७५ गुण व नागरिकांनी दिलेले २५ गुण विचारात घेऊ न सर्वाधिक गुण प्राप्त होणाऱ्या संकल्पनांची निवड केली जाणार आहे. यासाठी या संकल्पना आॅनलाईन करण्यात येतील. यावर नागरिक आपली पसंती नोंदवतील. सर्वाधिक गुणांच्या आधारे यातील दहा संकल्पनांची निवड केली जाणार आहे. या दहा संकल्पना सादर करणाऱ्यांना स्मार्ट सिटीचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले जाईल. तसेच दहापैकी एक ‘झकास ’ संकल्पनेबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत नागरिकांची मते जाणून घेण्यात येईल. याची १ डिसेंबरला निवड करण्यात येईल, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली. कचरा आणि रस्त्यावर थुंकणे, तसेच धुम्रपान या तीन विषयावर नागरिकांनी बोट ठेवले. ९४ टक्के नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास तयार असल्याचे मत नोंदविले. ९१ टक्के नागरिकांनी ओला व वाळल्या कचऱ्याची माहिती असल्याचे सांगितले. ९२ टक्के नागरिकांनी उघड्यावर शौच व लघवी करणार नाही असे सांगितले. ८२ टक्के नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रतिदिन १ रुपया शुल्क देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली. स्मार्ट सिटी अभियानाचा पहिला व दुसऱ्या टप्पा (अ) ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात स्वच्छतेला तर दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कशी असावी. तसेच अस्वच्छतेच्या कारणांचा शोध घेण्यात आला. याला शहरातील दहा झोन मधील ६४३६ नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांनी अस्वच्छतेची कारणे सांगितली.(प्रतिनिधी)